शहरं
Join us  
Trending Stories
1
अयोध्येतील पराभवावर गृहमंत्री अमित शाह पहिल्यांदाच बोलले, हरियाणात केलं मोठं विधान
2
“...तर राजकीय एन्काउंटर करु, आमच्या भानगडीत पडू नका”; मनोज जरांगेंचा अमित शाह यांना इशारा
3
मनोज जरांगे पाटील आता दसरा मेळावा घेणार? भव्य कार्यक्रम अन् शक्तिप्रदर्शन, तयारीला वेग!
4
PM मोदींची देशाला मोठी भेट, 500 नवीन इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग स्टेशनचे केले उद्घाटन....
5
Ayushman Card : कोणत्या हॉस्पिटलमधून 'आयुष्मान भारत योजनेतून' मोफत उपचार होणार? जाणून घ्या प्रोसेस
6
नसरल्लाहच्या मृत्यूनंतर जागतिक दहशतवादी हाशिम सफीद्दीन बनला हिजबुल्लाचा प्रमुख
7
"जर निवडणूक जिंकलो तर...!"; डोनाल्ड ट्रम्प Google वर भडकले, दिला थेट इशारा
8
IPL 2025 : मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांना खुशखबर; कोणता संघ कोणाला रिटेन करणार, वाचा
9
लेबनॉनचे लष्कर, सरकार गायब! लोक सिरियाकडे पलायन करू लागले, रात्र काढली रस्त्यावर बसून
10
भाजपा नेते हर्षवर्धन पाटलांना राष्ट्रवादीत घेणार का?; शरद पवारांचं मोठं विधान
11
जर CSK नं अनकॅप्ड प्लेयरच्या रुपात MS धोनीला रिटेन केलं तर किती असेल त्याचं पॅकेज?
12
Balasaheb Thorat : 'हर्षवर्धन पाटलांना चांगल्या संधी काँग्रेसमध्ये दिल्या, त्यांचा निर्णय चुकला'; बाळासाहेब थोरातांनी स्पष्टच सांगितलं
13
SL vs NZ 2nd Test: चला पुन्हा एक दिवस सुट्टीचा! परफेक्ट ड्युटीसह लंकेनं चौथ्या दिवशीच किवींचा खेळ केला खल्लास
14
मविआत उद्धव ठाकरेंवर दबाव?; ठाकरे गटाच्या नेत्याचा काँग्रेसला गर्भित इशारा
15
जितेंद्र आव्हाडांकडून खळबळजनक ऑडिओ क्लिप पोस्ट; अक्षय शिंदेची हत्या झाल्याचा दावा
16
'त्या' खेळाडूंवर बंदी घालायलाच हवी; नवीन नियमाचे इरफान पठाणकडून स्वागत; BCCI चे आभार!
17
पितृपक्षात सोम प्रदोष शिवरात्री: ‘या’ गोष्टी अवश्य करा; पितृदोष मुक्तता, महादेव कृपा करतील!
18
"कुठलाही आजार वगैरे झालेला नाही"; सुशांत शेलारने सांगितलं वजन का आणि कसं कमी झालं!
19
₹100000 पार जाणार सोन्याचा भाव...? दिसतोय US Fed च्या निर्णयाचा परिणाम! या वर्षात झाली 30% वाढ
20
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना पितृपक्षाची शुभ सांगता, ऑक्टोबर आणेल अच्छे दिन; अपार यश-लाभ!

बाईक टॅक्सीची कथा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 03, 2017 8:13 PM

बाईक टॅक्सी हा गोव्यात ब-याच काळापासून सलेला प्रवासी वाहतुकीचा प्रकार भारतात विविध शहरांमध्ये सुरू करण्याचा सरकारचा मानस आहे. पण हे खरोखरच वाहतुकीचा कोंडमारा झालेल्या शहरांना योग्य आहे की नाही, हा चर्चेचाच विषय होणार आहे.

केंद्रीय  रस्ते वाहतूक व महामार्गमंत्री नीतिन गडकरी यांनी अलीकडेच बाईक टॅक्सीस सुरू करण्याची संकल्पना मांडली. देशभरात या प्रकारच्या टॅक्सीमुळे मुंबईसारख्या वाहतुकीच्या वर्दळीच्या शहरात मोठ्या प्रमाणात फायदा होईल तर ग्रामीण भागातही त्याचा फायदा होईल.. लोकांना स्वस्त प्रवासाचे साधनही मिळू शकेल. अशा प्रकारची बाईक टॅक्सी भारतामध्ये केवळ एकाच राज्यात होती, ते म्हणजे गोवा राज्य. पर्यटनासाठी समृद्ध असलेल्या गोव्यामध्ये अगदी गोवा केंद्रशासित प्रदेश होते तेव्हापासून या गोव्यातील बाईक टॅक्सीने आपला विश्वास तयार केला आहे. अ्लीकडेच कोलकात्यामध्येही बाईक टॅक्सी सुरू झाली आहे. गोव्यात बाईक टॅक्सी चालवणा-या चालकाला पायलट असे म्हटले जाते. गोव्याप्रमाणेच जगातही अशा प्रकारच्या बाईक टॅक्सी चालवल्या जातात. त्यांचे नियम, परवाने आदी बाबींबाबत चांगलीच सुस्पष्टता तेथे आहे. कंबोडिया, ब्राझिल, कॅमेरून, इंडोनेशिया, नायजेरिया, फिलिपिन्स, स्वीडन, थायलंड, ब्रिटनस व्हिएतनाम, अमेरिका, चीन येथे या बाईक म्हणजे मोटारसायकलीवरून एका प्रवाशाला त्याच्या इप्सित ठिकाणी नेणे व त्याबदल्यात त्याच्याकडून भाडे घेणे. पण हा व्यवसाय इतका प्रभावी आहे की, या प्रकारच्या प्रवसाची ज्याला आवड आहे, गरज आहे, शारिरीकदृष्टीनेही परवडत आहे, एकट्यालाच प्रवासाची आवश्यकता आहे, अशासाठी साधारण चारचाकी टॅक्सी वा रिक्षा करण्याची गरज नसते. त्यांना नक्कीच ही बाईक टॅक्सी फायदेशीर पडेल यात शंका नाही. इंडोनेशियामध्ये या बाईक टॅक्सीला ओजेक असे म्हणतात. फिलिपिन्समध्ये या बाईकना साईडकारही असून त्यांना हबल हबल किंवा स्कायलॅब असे नाव आहे. व्हिएतनाममध्ये यांना झेआॅम असे नाव आहे. तर पूर्व आफ्रिकेत बोडा-बोडा असे म्हटले जाते. कंबोडियामध्ये मोटोडॉप्स असे म्हणतात. देशानुसार या बाईक टॅक्सींची नावे, त्या बाईक्सचे प्रकार, कंपनी, या जरी भिन्न असल्या तरी त्यांचा वापर करण्यामागे असलेले फायदे बहुतांशी ठिकाणी सारखेच दिसतात. किमान वर्दळीच्या वा अतिवाहतुकीच्या शहरांमध्ये तरी हा प्रकार उपयुक्त वाटला तरी आधीच वाहतुकीचा झालेला कोंडमारा पाहाता महाराष्ट्रातील किती शहरांमध्ये या बाईक टॅक्सी सुरू करणे योग्य ठरू शकेल, त्याचा विचार करण्याची मात्र वेळ नक्कीच आली आहे.