Tyres Always Black In Colour : गाड्यांच्या टायर्सचा रंग हा काळाच असतो. पण तुम्ही कधी विचार केला का की टायर्सचा रंग हा काळाच का असतो. तुम्हाला जाणून घेऊन आश्चर्य वाटेल की १२५ वर्षांपूर्वी टायर्स पांढऱ्या रंगात बनवले जात होते.
टायर्स तयार करण्यासाठी ज्या प्रकारच्या रबराचा वापर केला जातो, त्याचा रंग मिल्की व्हाईट असतो. परंतु तो पदार्थ इतकाही मजबूत नसतो की तो एक ऑटोमोबाइलचा भार झेलू शकेल आणि रोड्सवर चांगली कामगिरी करू शकेल. यासाठीच मिल्की व्हाईट रबरात आणि काही मजबूत (Strong Substances) पदार्थ एकत्र केले जातात.
कोणत्या गोष्टींचा होता वापर?मिल्की व्हाईट रबर (Milky White Rubber) अधिक मजबूत बनवण्यासाठी त्यामध्ये ब्लॅक कार्बन (Black Carbon) एकत्र केलं जातं. यामुळे टायरचा रंग काळा होता. कार्बन अॅड केल्यानं टायर मजबूत होतं आणि त्याची लाइफही वाढते. कार्बनमध्ये ऑटोमोबाइल पार्ट्सच्या आतील गरमी कमी करण्याची क्षमता असते. यामुळेच जेव्हा रस्ते गरम असतात तेव्हा टायर्स वितळत नाहीत.
याशिवाय कार्बन ब्लॅक सबस्टन्स टायर्सला युव्ही रेडिएशनपासूनही सुरक्षा पुरवतात. टायर्स मजबूत असणं प्रवाशांच्या सुरक्षेसाठी अतिशय आवश्यक असतं. त्यामुळे टायर्स निवडताना ते किती मजबूत आहे, त्याचं लाइफ आणि विश्वासार्हता पडताळून पाहिली पाहिजे.