नवी दिल्ली : बीएमडब्ल्यू मोटरराड इंडिया (BMW Motorrad India) आपली इलेक्ट्रिक स्कूटर 'CE-04' भारतात लाँच करणार आहे. दरम्यान, बीएमडब्ल्यूने भारतीय बाजारपेठेसाठी आपली पहिली स्कूटर लाँच करण्यासाठी अद्याप कोणतीही तारीख निश्चित केलेली नाही. मात्र, असे म्हटले जाते की, लवकरच बीएमडब्ल्यूची इलेक्ट्रिक स्कूटर भारताच्या रस्त्यावर दिसेल. कंपनीने अलीकडेच आपल्या एका इव्हेंटमध्ये या स्कूटरची पहिली झलक दाखवली. ही भारतातील सर्वात महागडी इलेक्ट्रिक स्कूटर असेल, असे म्हटले जात आहे. ही बीएमडब्ल्यूची पूर्णपणे इलेक्ट्रिक स्कूटर असणार आहे.
कंपनी ही स्कूटर 2023 मध्ये लाँच करण्याची शक्यता आहे. तसेच, स्कूटरची किंमत सुमारे 20 लाख रुपये (एक्स-शोरूम) असू शकते. जर ही किंमत खरोखर अशीच राहिली, तर BMW CE-04 ही भारतातील सर्वात प्रीमियम इलेक्ट्रिक स्कूटर बनणार आहे. दरम्यान, ज्या इव्हेंटमध्ये कंपनीने या स्कूटरची पहिली झलक दाखवली होती, त्याच इव्हेंटमध्ये 20.25 लाख रुपयांची (एक्स-शोरूम) सुपर बाईक S-1000 RR लाँच केली होती.
बीएमडब्ल्यूच्या पहिल्या इलेक्ट्रिक स्कूटरला 8.9 किलोवॅट तास (kwh) लिथियम-आयन बॅटरी मिळेल. एकदा चार्ज केल्यानंतर स्कूटर जवळपास 130 किमी (129 किमी अचूक) अंतर कापण्यास सक्षम असणार आहे. तुम्ही 2.3 KW च्या चार्जरने 4 तास 20 मिनिटांत बॅटरी पूर्णपणे चार्ज करू शकता. तसेच, 6.9 kW चे फास्ट चार्जर केवळ 1.40 तासांमध्ये 100 टक्के चार्ज करणार आहे.
स्कूटरचे डिझाइनडिझाइनबद्दल बोलायचे झाले तर CE-04 ही स्कूटर खूप वेगळी दिसणारी आहे. स्कूटरला एक मोठा एलईडी हेडलॅम्प आहे. ज्याच्या समोर एक लहान व्हिझर आहे. स्कूटरला सिंगल पीस सीट मिळते, जी बरीच लांब असते. तसेच, स्कूटरमध्ये तुम्हाला मोठे फूट-रेस्ट आणि एक्सपोज केलेले बॉडी पॅनल्स पाहायला मिळतील. या स्कूटरमध्ये तुम्हाला इतरही अनेक फीचर्स पाहायला मिळतील. उदाहरणार्थ, तुम्हाला ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी, ट्रॅक्शन कंट्रोल, मल्टिपल राइडिंग मोड यासारखे फीचर्स मिळतील. यासोबतच तुम्हाला 10.25 इंचाचा डिजिटल डिस्प्ले देखील मिळेल.
यामाहा सुद्धा लाँच करणार ई-स्कूटरयामाहा इंडियाचे अध्यक्ष इशिन चिहाना यांनी सांगितले की, कंपनी भारतात इलेक्ट्रिक स्कूटर लाँच करण्याच्या प्रक्रियेत आहे. सध्या निओ ई-स्कूटर आयात केली जाईल आणि येथील मागणी आणि अटींनुसार ती पुन्हा चालू केली जाईल, असे त्यांनी सांगितले आहे.