शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
2
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
3
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
4
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
5
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
6
"देवेंद्र फडणवीस हे भारतीय राजकारणाचे भविष्य"; केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान यांचे विधान
7
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
8
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
9
"बंद सम्राटांना कायमचं घरात बंद करायची वेळ आलीय"; CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष निशाणा
10
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
11
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
13
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
14
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
15
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
16
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
17
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
18
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
19
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
20
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर

एक्स्प्रेस हायवेवर बोगस 'पीयुसी'चा विळखा; पेट्रोल पंपावरच होतेय फसवणूक

By हेमंत बावकर | Published: October 05, 2019 2:09 PM

मोटर वाहन अधिनियम १९८८ मधील तरतुदीनुसार मोटर वाहनाची वायू प्रदूषण तपासणी करून प्रमाणपत्र देण्याचे अधिकार वायू प्रदूषण तपासणी केंद्रांना देण्यात आले आहेत.

- हेमंत बावकरमुंबई : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या दिल्लीत असलेल्या कारची पीयुसी महाराष्ट्रात तीन ठिकाणी काढत 'लोकमत'ने घोटाळा उघड केला आहे. यावरून राज्यभरात खळबळ उडाली होती. यामुळे सर्व पीयुसी केंद्रे ऑनलाईन करण्याचा आदेश आरटीओने दिलेला असला तरीही एक्स्प्रेस हायवेवर वाहने न तपासताच पीयुसी देण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. 

मोटर वाहन अधिनियम १९८८ मधील तरतुदीनुसार मोटर वाहनाची वायू प्रदूषण तपासणी करून प्रमाणपत्र देण्याचे अधिकार वायू प्रदूषण तपासणी केंद्रांना देण्यात आले आहेत. वाहनामधील इंधन जळत असल्याने कार्बनडाय ऑक्साईडसारखे वायू उत्सर्जित होतात. यामुळे प्रदूषण होते. हे वायू किती प्रमाणात उत्सर्जित व्हावेत याबाबत सरकारने लिमिट ठरवून दिले आहे. आणि हे मोजण्यासाठी पीयूसी केंद्रे उभारली आहेत. मात्र, ही केंद्रेच या उद्देशाला हरताळ फासत आहेत. 

मुंबईहून पुण्याकडे जाताना लागणाऱ्या पहिल्या फुडमॉलआधी हिंदुस्थान पेट्रोलियम कंपनीचा पेट्रोल पंप आहे. या पंपाच्या मालकाने याठिकाणी हवा भरण्याचे केंद्र, नायट्रोजन, पंक्चर अशी केंद्रे मागच्या बाजुला सुरू केली आहेत. याठिकाणी पीयुसी तपासणी केंद्रही आहे. मात्र, या केंद्रामध्ये वाहने न तपासताच पीयुसी दिली जात असल्याचा प्रकार 'लोकमत'च्या निदर्शनास आला आहे. या केंद्रावरील कर्मचाऱ्याला याबाबत विचारणा केली असता, त्याने वाहनाच्या सायलेन्सरमध्ये सेन्सर टाकून तपासण्याची गरज नसल्याचे सांगितले. 

 

 

10 रुपये अधिकची आकारणीया केंद्राच्या पत्र्याच्या भिंतीवर पेट्रोल पीयुसी 90 रुपये आणि डिझेल पीयुसी 120 रुपये असे लिहिलेले आहे. मात्र, आरटीओचे दर दुचाकी वाहन ३५ रुपये, पेट्रोलवरील तीनचाकी वाहने ७० रुपये, पेट्रोल, सीएनजी, एलपीजीवर चालणारी चारचाकी वाहने ९० रुपये, डिझेलवर चालणारी वाहने ११० रुपये असे आहेत. या बाबतही विचारणा केली असता त्याने एक्स्प्रेस हायवेवरील आहे ना असे उत्तर दिले. तुम्ही 110 रुपयेच द्या असे ही सांगितले. 

दरपत्रक आरटीओने ठरवून दिलेले असताना जादाची रक्कम आकारण्याचा पेट्रोल पंप मालकाला अधिकार कोणी दिला? तसेच वाहनाची तपासणी करणे गरजेचे असताना तपासणी न करताच पीयूसी प्रमाणपत्र दिले जात आहे. हे बेकायदेशीर नाही का? असे प्रश्न उपस्थित होत आहेत. 

टॅग्स :Rto officeआरटीओ ऑफीसNitin Gadkariनितीन गडकरीMumbai-Pune Express Wayमुंबई-पुणे एक्सप्रेस वेfraudधोकेबाजीpollutionप्रदूषणcarकारPetrol Pumpपेट्रोल पंप