एमजी मोटार इंडियाने MG Astor SUV साठी आज बुकिंग सुरु केले होते. परंतू अवघ्या काही मिनिटांतच सगळ्या कारची विक्री झाली आहे. या कारची डिलिव्हरी 1 नोव्हेंबरपासून सुरु करण्यात येणार असून पुढील वर्षीचे बुकिंग सुरु असल्याचे कंपनीने सांगितले आहे.
कंपनी नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये फक्त 5000 एमजी अॅस्टर विकणार आहे. ही बुकिंग फुल झाली आहे. ग्राहकांना २०२२ या वर्षासाठी अॅस्टरची बुकिंग कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवर तसेच अधिकृत एमजी शोरूममध्ये जाऊनही करता येणार आहे. ही भारताची पहिली पर्सनल एआय असिस्टंट आणि आपल्या सेग्मेंटमधली पहिली ऑटोनॉमस (लेव्हल-२) टेक्नॉलॉजी असलेली मध्यम आकाराची एसयूव्ही आहे.
एमजी मोटार इंडियाचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक राजीव छाबा म्हणाले की, जगभरातील वाहन उद्योग चिपच्या तुटवड्याला सामोरा जात आहे. यामुळे आम्ही यंदा मोजक्या संख्येनेच कारचा पुरवठा करू शकू. येत्या वर्षातील पहिल्या तिमाहीपासून पुरवठा सुरळीत होण्याची आम्हाला आशा आहे.
MG Motors ने अॅस्टरला 9,78,000 रुपये एक्स शोरुम या किंमतीमध्ये आणले आहे. तर या कारच्या टॉप मॉडेलची किंमत 16,78,000 रुपये आहे. MG Astor ही Hyundai Creta आणि Kia Seltos ला थेट टक्कर देणार आहे. मारुतीची ब्रेझा जरी या रेंजमध्ये असली तरी देखील फिचर्सच्या तुलनेत ती खूप मागे आहे. MG Astor मध्ये जो एआय रोबोट असेल त्याचा आवाज पॅरालंपीक अॅथलिट दीपा मलिक (Deepa Malik) चा असणार आहे. हा रोबोट कारला कनेक्टेड फिचर्सशी संबंधीत अनेक काम करणार आहे. याद्वारे तुम्ही कार अनलॉक, लॉक करण्याचे काम करेल. गाडीमध्ये एकूण 27 स्टँडर्ड सेफ्टी फिचर्स आणि 49 अन्य सेफ्टी फिचर्स व्हेरिअंटनुसार देण्यात आले आहेत.
संबंधीत वृत्त...MG Astor Price: दीपा मलिकचा आवाज, देशातील पहिली रोबोट कार; MG Astor ची किंमत जाहीर