भारतात एखादी नवी कार खरेदी करणे म्हणजे, एखादे स्वप्न पूर्ण करण्यासारखे आहे. एक मोठा ग्राहक वर्ग असा आहे, जो कमी किंमतीच्या आणि त्यांच्या कुटुंबासाठीही परफेक्ट असेल, अशा एखाद्या कारच्या शोधात असतो. आज आम्ही आपल्याला अशाच मारुती सुझुकीच्या कारसंदर्भात माहिती देणार आहोत. जी आपण केवळ ₹40000 रुपयांत घरी घेऊन जाऊ शकतात. या कारचे वैशिष्ट म्हणजे ही कार मायलेच्या बाबतीतही जबरदस्त आहे. हिचे मायलेड तब्बल 33 किलोमीटरहूनही अधिक आहे.
ज्या कारसंदर्भात आपण बोलत आहोत, त्या कारचे नाव आहे, मारुती सुझुकी अल्टो K10 (Maruti Suzuki Alto K10). या कारची किंमत 3.99 लाख रुपयांपासून सुरू होते. आणि 5.95 लाख रुपयांपर्यंत जाते (एक्स-शोरूम). पण, आपल्याला या कारचे बेस व्हेरिअँट डाऊन पेमेंटमध्ये खरेदी करायचे असेल, तर जाणून घ्या यासाठीच्या ईएमआयसंदर्भात.
उदाहरणार्थ, जर आपल्याला ही कार 10 टक्के डाऊन पेमेंटवर घ्यायची असेल, तर अर्था आपण बेस व्हेरिअँटसाठी जवळपास ₹40000 द्यावे लागतील. तर 9.5 टक्के व्याजदराप्रमाणे 5 वर्षांसाठी आपल्याला जवळपास ₹7500 रुपयांचा इएमआय चुकवावा लागेल
इंजिन आणि मायलेज -मारुती ऑल्टो K10 मध्ये 1-लीटर ड्युअल जेट पेट्रोल इंजिन (67PS आणि 89Nm)मळतो. हिला 5-स्पीड मॅन्यूअल ट्रांसमिशन आण 5-स्पीड AMT चा गिअर बॉक्स ऑप्शन देण्यात आला आहे. वशेष म्हणजे या कारमध्ये सीएनजी किटदेखील मिळते. हिच्यासोबत इंजिन 57PS आणि 82.1Nm पॉवर जनरेट करते. कारचे पेट्रोल मॉडे 24.90 किमी/लिटर एवढे मायलेज देते. तर सीएनजीसह ही कार, 33.85km/kg पर्यंतचे मायलेज ऑफर करते.