शहरं
Join us  
Trending Stories
1
बंडखोर ऐकेनात, मनधरणीसाठी महायुतीच्या नेत्यांचा कस; माघारीसाठी काय रणनीती?
2
विधान परिषद, महामंडळ देतो; अर्ज मागे घ्या... मविआत बंडोबांना थंड करण्याचे प्रयत्न!
3
अयोध्येत २५ लाख दीपोत्सवाचा विश्वविक्रम... १,१२१ जणांनी एकाच वेळी केली आरती 
4
सोने लक्ष्मीपूजनापूर्वीच प्रथमच गेले ८० हजारांवर; चांदीनेही खाल्ला भाव
5
"डाेनाल्ड ट्रम्प अस्थिर, प्रतिशोधाने पछाडलेले...", शेवटच्या भाषणात कमला हॅरिस यांचा हल्लाबोल
6
इस्रायलचा हल्ला, गाझात ८८ जण ठार; अन्न, पाण्यासह औषधांचीही चणचण
7
स्वदेशी संस्थांनी केली ४.६ लाख कोटींची गुंतवणूक, शेअर बाजारात सार्वकालिक उच्चांक
8
पोलिसांनी एसी, कॉम्प्युटर, टीव्ही फुकट घेतले; पैसे मागितल्यानंतर वापरलेल्या वस्तू केल्या परत 
9
दोन ठिकाणांवरील भारत, चीन सैन्य मागे घेण्याची प्रक्रिया पूर्ण
10
भाजप बंडखोर उमेदवार विशाल परब यांच्या गाडीवर हल्ला 
11
विराटला लग्नासाठी प्रपोज करणाऱ्या इंग्लिश खेळाडूची RCB मध्ये एन्ट्री; चाहत्यांनी घेतली फिरकी
12
'...तर अजित पवार पुन्हा विचार करतील'; नवाब मलिकांबद्दल शिंदेंच्या शिवसेनेची भूमिका काय?
13
Shubman Gill कमी पगारात मोठी जबाबदारी घ्यायला झालाय 'राजी'; जाणून घ्या त्यामागचं कारण
14
'सचिन तेंडुलकर फाऊंडेशन'सोबत 'क्रिकेटच्या देवा'ची दिवाळी; साराने शेअर केली झलक, Photos
15
"एका जातीवर कुणीच निवडून येऊ शकत नाही, त्यासाठी दलित, मुस्लीम अन् मराठा..."
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शरद पवारांच्या उमेदवाराचा अर्ज बाद झाला? फहाद अहमद यांनी केला खुलासा; म्हणाले,...
17
“तुमच्याकडे वडील म्हणून पाहतो आणि तुम्ही...”; अजित पवारांच्या आरोपांवर आर आर पाटलांच्या कन्येचं प्रत्युत्तर
18
त्यांना दिवसातून तीनदा मीच का दिसतो? फडणवीसांचा सवाल; जरांगे पाटलांनीही दिलं प्रत्युत्तर!
19
"राजसाहेब, माझ्यासारख्या कार्यकर्त्यावर अन्याय करू नका"; सदा सरवणकरांचं मोठं विधान
20
कोण होणार महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री? राज ठाकरेंनी थेट नावच सांगितलं, केली मोठी भविष्यवाणी!

उंदरांच्या त्रासापासून काही प्रमाणात सुटका करण्यासाठी वापरा तारेचा ब्रश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 04, 2017 5:56 PM

उंदरापासून कारमधील वायर्सचे, प्लॅस्टिक, रबराचे संरक्षण कसे करायचे हा प्रश्न अनेकांपुढे आहे. त्यासाठी काही ना काही उपाय करावे लागतात.तारेचा ब्रश, आयर्न गॉझ याचा वापरही करणे प्रभावी ठरू शकते. 

उंदरापासून कारमधील वायर्सचे, प्लॅस्टिक, रबराचे संरक्षण कसे करायचे हा प्रश्न अनेकांपुढे आहे. त्यासाठी काही ना काही उपाय करावे लागतात.तारेचा ब्रश, आयर्न गॉझ याचा वापरही करणे प्रभावी ठरू शकते. मुळात कारचा नियमित वापर व सभोवताली स्वच्छता ही मात्र आवश्यक आहे, हे ही लक्षात ठेवायला हवे.उंदीर हा गणरायाचे वाहन असला तरी माणसाच्यादृष्टीने अनेक बाबतीत त्रासदायक असाच प्राणी आहे. धान्य, धान्याची गोदामे, रिकामी घरे इतकेच नव्हे तर तुमच्या कार व स्कूटर, मोटारसायकल यासाठीही तो खूपच त्रासदायक ठरतो.त्याच्या दाताची रचना व ते सतत वाढण्याची त्याची शारिरीक स्थिती यामुळे उंदराला सारखे काही कुरतडायला लागते. त्यामुळे त्याच्या दाताची झीज होते व सतत होणाऱ्या दाताच्या वाढीमुळे त्याचेच दात त्याच्या तोंडातील भागातून अगदी त्याच्या डोक्यातील भागातही घुसू शकतात. यामुळेच जिवंत राहाण्यासाठी दाताचे सतत घर्षण करून त्याची झीज करीत राहाणे त्या उंदराला गरजेचे असते. पण यापासून माणसाला मात्र नुकसान सहन करावे लागते. कार, स्कूटर, ट्रक, बस, मोटारसायकल यांच्या वायरींगचे इतकेच काय अगदी टायरचेही हा उंदीर नुकसान करतो. कारच्या बॉनेटमध्ये शिरतो, तळातील भागातही कुठे कुठे असलेल्या रबरी वा प्लॅस्टिक वायरी कुरतडतो. यामुळे अनेकांना गाडी सुरू न होणे, स्पार्किंग होमे असे त्रास सहन करावे लागतात. काय करावे या उंदरांचे असे अनेकांना होऊन जाते. उंदरांसाठी औषधेही काहीजण मारतात पण त्याचा काही उपयोग होत नाही. विशेष करून कारच्या बॉनेटमध्ये असलेले वायरिंग जे सर्वसाधारण वापरकर्त्यालाही फार झंझट न करता उघडता येते, तेथे त्याला अनेकदा उंदराने वायरी, एसीच्या पाईपवरील रबरी आवरण, एखाद्या पाईपवरील आवरण, इतकेच काय कूलन्टच्या प्लॅस्टिक टाकीच्या बाह्य भागातही उंदराचे दार लागलेले दिसतात. कधीकधी त्यामुळे तेथे गळतीही लागलेली असते. हे सर्व टाळण्यासाठी बाजारात तसा फार मोठे उपाय आहेत असे दिसत नाही. पण तारेचा ब्रश हा त्यावरील काहीसा संरक्षक उपाय असल्याचा अनुभव काही मेकॅनिकना वाटतो.विशेष करून तारेचा ब्रश हा बाथरूम वा मोरी घासण्यासाठी वापरला जातो. सध्या फार प्रमाणआत तो बाजारात मिळतो असे नाही, तारेऐवजी प्लॅस्टिकचा ब्रश सध्या बाजारात मिळतो. पण उंदीर येऊ नये म्हणून तो कारच्या बॉनेटमध्ये लावण्यात फार अर्थ नाही. त्यासाठी तारेचा ब्रश असेल तर उत्तम. बॉनेटमध्ये अशा काही जागा असतात, जेथे मागच्या दोन पायांवर उभा राहून उंदीर वायरी सहजपणे कुरतडू शकतो. अशा जागी तारेच्या ब्रशच्या मागच्या लाकडाला त्या मोकळ्या जागेत दोन्ही बाजूने चिकटणाऱ्या पट्टीने तेथे ब्रश चिकटवता येतो. त्यामुळे उंदीर तेथे उभा राहू शकत नाही, त्याच्या पायाला तारा लागल्याने तो तेथे उभा राहून काही करण्याचा प्रश्न नसतो. बॉनेटमध्ये तसे पाहायला गेले तर साधारण ४-५ जागी अशा ब्रशचा वापर करता येतो.

अन्य ठिकाणी तारेचा गुंडा भांडी घासण्यासाठी किंवा गंज काढण्यासाठी वापरला जातो, त्याचाही काही जागी वापर करता येतो. त्याठिकाणी तो गुंडा चिकटवता येतो व तो तेथे काहीसा पिंजून ठेवला तर उंदराचे पाय त्यात अडकू शकतात, त्यामुळे उंदीर तेथे येण्याचे प्रमाण खूप कमी होते. साधारणपमे ज्यांच्याकडे गॅरेज स्वतंत्र आहे, त्यांना गॅरेज स्वच्छ ठेवणे हा प्रमुख उपाय करता येतो. तरीही त्यांना ही व्यवस्था पाहावी लागते. बराच काळ कार न चालवता उभी असेल, तर उंदीर पहिला त्या कारकडे जातो. माणसाची वा अन्य कोणाची चाहूल लागताच तो साधारणपणे तेथे येत नाही. मात्र रात्रीच्यावेळी सारेकाही शांत असताना तो तेथे येत असतोच.यासाठी काही प्रमाणात का होईना दक्षता म्हणून या तारेच्या ब्रशचा वा लोखंडी बारीक क्रश गुंड्याचा ( लोखंडी बारीक धाग्यांचा गॉझ – iron gauz) वापर करायला काही हरकत नाही.विद्युत साहित्य मिळणाऱ्या दुकानात, हार्डवेअरच्या दुकानात प्लॅस्टिकचे फ्लेक्झिबल पाईप (केबल) मिळतात. कारमधील काही वायरींगवर ते उभे कापून लावायलाही हरकत नाही. मात्र ते त्या वायरभोवती घट्ट न लावता लावावेत. म्हमजे त्यामुळे ती वायर त्या फ्लेक्झिबल पाइपामध्ये सुरक्षित राहू शकते. ती वायर सैलसर पद्धतीने त्या पाइपात असावी, पाइप वायरीच्या आकारापेक्षा काहीसा मोठा घ्यावा. त्यामुळे उंदराला तो पकडतानाही कठीण असेल. कारण त्याच्या पकडीत तो पाइप येणार नाही, त्यामुळेही कारमधील वायरचे बऱ्यापैकी संरक्षण होई शकेल.पेस्ट कंट्रोल करूनही फार फरक पडत नाही. मात्र वर सांगितलेल्या फ्लेक्झिबल केबलचा वापर वा त्यावरही ग्रीसमध्ये उंदराचे औषध घेऊन लावणे हे उपायही करता येतात. मात्र मुळात कारची व आजूबाजूची स्वच्छता असणे व राखणे हे अधिक महत्त्वाचे.

टॅग्स :Automobileवाहन