Log 9 materials: भारतात इलेक्ट्रिक वाहनांची मागणी वाढत असल्यामुळे अनेकजण या क्षेत्रात हात आजमावत आहेत. यातच आता बॅटरी टेक स्टार्टअप लॉग 9 मॅटेरियल्सने आज हैदराबादमधील EV फर्म क्वांटम एनर्जीसोबत करार केला आहे. आता या दोन्ही कंपन्यांनी सर्वात वेगाने चार्ज होणारी टू-व्हीलर कमर्शियल इलेक्ट्रिक (सीईव्ही) लॉन्च केली आहे.
या दोन्ही इलेक्ट्रिक व्हीकल कंपन्यांनी करारांतर्गत एक नवीन मॉडेल लॉन्च केले आहे. याला 'बिजनेसलाइट इंस्टाचार्ज बाय लॉग9' नाव दिले आहे. या गाडीला पॉवर देण्यासाठी लॉग9 ची रॅपिडएक्स 2000 बॅटरीचा वापर केला आहे. ही बॅटरी फक्त 12 मिनिटांत फुल चार्ज होते.
या इलेक्ट्रिक टू-व्हीलरमध्ये अनेक फीचर्स देण्यात आले आहेत, जसे वेगवान स्पीड, क्विक अॅक्सेलरेट, 80-90 किलोमीटर्सची रेंज आणि मल्टी थेफ्ट अलार्मसह मल्टिपल ड्रायव्हिंग मोड्स आहेत.
लॉग 9 आणि क्वांटम एनर्जी सोबत मिळून मार्च 2024 पर्यंत संपूर्ण भारतात 10,000 इंस्टाचार्जने सुसज्ज टू-व्हीलर बाजारात आणण्यासाठी सातत्याने काम करत आहे. पण, अद्याप या स्कूटरच्या किमतीबाबत माहिती समोर आली नाही. कंपनी आपल्या फास्ट चार्जिंग आणि लॉन्ग लास्टिंग रॅपिडएक्स 2000 बॅटरीसोबत भारतातील लॉजिस्टिक सेक्टरमध्ये एन्ट्री घेण्याच्या तयारीत आहे.