भारतीय विमा नियामक विकास प्राधिकरण (IRDAI) 'थर्ड पार्टी मोटर' आणि 'ऑन डॅमेज इन्शुरन्स' (Motor Third Party and Own Damage Insurances) संबंधित नियमांमध्ये बदल करणार आहे. IRDAIच्या सूचनेनुसार, हे नियम बदलल्यानंतर नवीन कार खरेदीदारांना 3 आणि 5 वर्षे कारचा विमा घेण्यास भाग पाडले जाणार नाही. कंपनीने पॅकेज कव्हर मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. हे नियम 1 ऑगस्टपासून लागू होणार आहेत. नवीन नियमांची अंमलबजावणी झाल्यानंतर याचा थेट परिणाम 1 ऑगस्टनंतर नवीन कार खरेदी करणा-यांवर होणार आहे.जर पाहिले तर ज्यांनी आधी कार विकत घेतली आहे, त्यांच्यावरही त्याचा परिणाम होणार नाही. हे दीर्घकालीन विमा पॅकेज सर्वोच्च न्यायालयाने 1 सप्टेंबर 2018 रोजी सादर केले. दीर्घकालीन म्हणजे दुचाकी वाहनांसाठी पाच वर्षे आणि चारचाकी वाहनांसाठी तीन वर्षे 'मोटर थर्ड पार्टी पॉलिसी' लागू केली गेली. यानंतर विमा कंपन्यांनी दीर्घ मुदतीच्या पॅकेज योजना सादर केल्या, ज्यात तृतीय पक्षा(third party insurance)ची आणि नुकसानीची माहिती उपलब्ध होती.कार आणि दुचाकी खरेदी स्वस्त होईल - मोटार वाहन विमा बदलल्यास पुढील महिन्यापासून नवीन कार किंवा बाईक खरेदी करणे थोडे स्वस्त होईल. याचा कोरोना कालावधीतील कोट्यवधी लोकांना फायदा होईल. IRDAIनं सांगितले की, दीर्घकालीन पॅकेज पॉलिसीमुळे नवीन वाहन खरेदी करणे लोकांसाठी महागडे ठरते.थर्ड पार्टी कव्हर आणि ऑन डॅमेज कव्हर म्हणजे काय - कोणत्याही दुर्घटना झाल्यास मोटार विमा पॉलिसी आपल्याला प्रामुख्याने दोन प्रकारचे कव्हर, थर्ड पार्टी कव्हर आणि नुकसान कव्हर देते. मोटार वाहन कायद्यांतर्गत सर्व वाहन मालकांना थर्ड पार्टी विमा घेणे आवश्यक आहे. विमा हा तीन प्रकरचा असतो, फर्स्ट पार्टी, सेकंड पार्टी आणि थर्ड पार्टी, ज्याला विमाधारकामुळे तोटा सहन करावा लागतो. त्यामुळे नुकसान झालेली पार्टी तोट्यासाठी अर्ज करू शकते. विमा पॉलिसीच्या माध्यमातून त्याच्या नुकसानाची भरपाई केली जाते. विमा पॉलिसी त्याचा तोटा कव्हर करते. ज्यानं विमा काढलेला असतो, त्याला नुकसानभरपाई दिली जाते. जसे की वाहनाचे नुकसान किंवा इतर कोणतेही नुकसान.
हेही वाचा
UPPCLमध्ये बंपर भरती; १०वी पासही करू शकतात अर्ज, थेट सातव्या आयोगानुसार मिळणार पगार
फक्त बँकाच नव्हे, तर 'या' कंपन्यांनाही मोदी सरकार विकण्याच्या तयारीत; असा आहे 'प्लॅन'
पाकिस्तानचा चीनला दे धक्का; बिगो अॅप बॅन, आता टिकटॉकवर टांगती तलवार
माइन्समध्ये लपलेल्या शत्रूलाही शोधून करणार ठार, 'या' तंत्रज्ञानानं भारताचे टी-90 टँक सुसज्ज
चाबहार रेल्वे प्रकल्पातून भारताला वगळलं ही तर अफवा; इराणनं केलं स्पष्ट
देशात राहणार आता फक्त ५ सरकारी बँका; मोदी सरकार भागीदारी विकणार