Mahindra Thar Modification Jail: अनेकदा लोक त्यांची गाडी आकर्षक बनवण्यासाठी त्यात विविध मॉडिफीकेशन करतात. प्रामुख्याने दुचाकी गाड्यांमध्ये मॉडिफीकेशन करण्याची क्रेझ आहे. पण, आका काहीजण आपल्या चारचाकी गाड्यांमध्येही बदल करत आहेत. यात सर्वाधिक मॉडिफीकेशन महिंद्राच्या थारमध्ये केलेले पाहायला मिळतात. पण, कधी-कधी याच मॉडिफीकेशनमुळे मोठ्या अडचणीचाही सामना करावा लागू शकतो.
मॉडिफीकेशनमुळे तुरुंगवासअनेकजण आपल्या महिंद्रा थारमध्ये हेडलाइटपासून टायर आणि फीचर्सपर्यंत, अनेक गोष्टी बदलतात. परंतू, यामुळे तुम्ही अडचणीत येऊ शकता. गाडी कोणतीही असो, पण मर्यादेपेक्षा जास्त मॉडिफीकेशन करणे कायद्याविरोधात आहे. आता एक ताजे प्रकरण जम्मू-काश्मीरमधून आले आहे. TOIच्या रिपोर्टनुसार, जम्मू-काश्मीर कोर्टाने अशाच एका प्रकरणात एका मालकाला 6 महीन्यांची शिक्षा सुनावली आहे.
कार मालकाने काय केलं?कार मालकाने आपल्या महिंद्रा थार एसयूव्हीमध्ये मर्यादेपेक्षा जास्त मॉडिफीकेशन केले. मालकाने कारचा लूक बदलण्यासोबतच कारमध्ये एक सायरन बसवला. हे थेट मोटर वाहन अधिनियम 1988 (एमवी अधिनियम) ची कलम 52 चे उल्लंघन आहे. मिळालेल्या माहितीनुसार, त्या व्यक्तीने आपल्या जुन्या महिंद्रा थारमध्ये एक हार्ड टॉप, मोठे टायर, एलईडी लाइट्स यासोबतच एक सायरन बसवले होते.
नियम काय सांगतात?- मॉडिफीकेशनबाबत काही नियम असतात, ज्यानुसार मर्यादेपेक्षा जास्त मॉडिफीकेशन करता येत नाही.- कारची विंड स्क्रीन आणि मागच्या काचांवर ब्लॅक फिल्म बसवता येत नाही.- गाडीमध्ये ध्वनी प्रदूषण करणारे सायलेंसर बसवता येत नाह.- कारचा रंग आणि आकार बदलता येत नाही. म्हणजेच कारची मूळ संरचणा बदलणे गुन्हा आहे.