शहरं
Join us  
Trending Stories
1
जाना था जापान, पहुंच गए चीन...! पंकजा मुंडेंसोबत असेच घडले, हेलिकॉप्टर सिडकोऐवजी सायखेड्याला पोहोचले
2
उद्धव ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का; राज ठाकरेंचा नाशिकमधील विश्वासू शिलेदार फोडला
3
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्लेनमध्ये तांत्रिक बिघाड, देवघर एअरपोर्टवर थांबलं विमानात
4
हिंगोलीत निवडणूक अधिकाऱ्यांकडून अमित शाहांच्या बॅगांची तपासणी;म्हणाले, "लोकशाहीसाठी आपण..."
5
Maharashtra Election 2024: महायुतीतील मैत्रीपूर्ण लढतीच्या साठमारीत अपक्ष करणार का 'विक्रम'?
6
अब्दुल सत्तारांच्या पराभवासाठी सिल्लोडमध्ये उद्धव ठाकरेंची भाजपला साद
7
Ajay Gupta : कल्पकतेला सॅल्यूट! व्हीलचेअरवर असतानाही मानली नाही हार; उभं केलं १०० कोटींचं साम्राज्य
8
कर्नाटकच्या विरोधी पक्षनेत्याला हनीट्रॅपमध्ये अडकवून HIV बाधित करण्याचा होता प्लॅन? पोलीस निरीक्षकाला अटक
9
महाराष्ट्रात योगी आदित्यनाथ यांनी खरंच बुलडोझरवर चढून प्रचार केला का? जाणून घ्या सत्य
10
भाषण करताना सुरू झाला पाऊस, निवडणुकीचा निकाल चांगला लागणार, शरद पवारांचं विधान
11
Maharashtra Election 2024 Live Updates: अमित शाहांचा उद्धव ठाकरेंना सवाल; "खरी शिवसेना कधीही..."
12
"...अन् दुसऱ्याच दिवशी भाजपात गेले"; शरद पवारांनी सांगितला संजय पाटलांचा इतिहास
13
गुजरातच्या पोरबंदर किनाऱ्यावर 700 किलो ड्रग्ज जप्त, NCB आणि नौदलाची मोठी कारवाई
14
Mumbai Metro 3 Fire BREAKING: मेट्रो-३ च्या बीकेसी स्टेशनला आग, सर्व फेऱ्या रद्द; प्रवासी सुखरुप
15
“राहुल गांधींच्या सभांना प्रचंड प्रतिसाद, PM मोदींचं रिकाम्या खुर्च्यांना संबोधन”: चेन्नीथला
16
भाजपकडून मुख्यमंत्रिपदासाठी विनोद तावडे, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळेंचीही चर्चा
17
एकदम कडक! WhatsApp वर येणार दमदार फीचर; मेसेजची 'ही' मोठी समस्या होणार दूर
18
Raamdeo Agrawal on Share Market : शेअर बाजारातील घसरणीचा टप्पा हा तात्पुरता, परदेशी गुंतवणूकदार बाजारात परतणार : रामदेव अग्रवाल
19
Video: तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
20
विधेयक फाडलं अन् संसदेत केला आगळावेगळा डान्स; महिला खासदाराचा व्हिडिओ व्हायरल

Car Servicing Tips: सर्व्हिस सेंटरमध्ये जावे की लोकल मॅकेनिक? कोणाकडे गेल्यास होईल फायदा, जाणून घ्या...

By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2021 3:21 PM

company authorized service center VS local mechanic: अधिकृत सर्व्हिस सेंटर आणि स्थानिक मेकॅनिक या दोघांचे स्वतःचे फायदे आणि तोटे आहेत. येथे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की सर्व्हिसिंग करण्याचा निर्णय घेण्यापूर्वी तुम्हाला कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात.

कारची वेळेवर सर्व्हिसिंग करणे खूप महत्वाचे आहे आणि त्याचा परिणाम वाहनाच्या मायलेजवर होतो. आजकाल सर्वत्र कार सर्व्हिसिंग केली जात आहे. अनेकांना कंपनीच्या सेवा केंद्रातच सेवा घेणे योग्य वाटते, तर बरेच लोक स्थानिक मेकॅनिकवर अधिक अवलंबून असतात. आज आम्ही तुम्हाला हे सांगणार आहोत की जर तुम्ही कार, दुचाकी अधिकृत सर्व्हिस सेंटर किंवा स्थानिक मेकॅनिककडून सर्व्हिसिंग करून घेतली तर तुम्हाला फायदा होईल.

अधिकृत सर्व्हिस सेंटर आणि स्थानिक मेकॅनिक या दोघांचे स्वतःचे फायदे आणि तोटे आहेत. येथे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की सर्व्हिसिंग करण्याचा निर्णय घेण्यापूर्वी तुम्हाला कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात.

कंपनीचे सर्व्हिस सेंटरजर तुमची कार नवीन असेल किंवा सर्व्हिसिंग मोफत असेल, तर तुम्हाला विचार करण्याची गरज नाही. तुम्ही थेट कंपनीच्या सर्व्हिस सेंटरमध्ये जाऊन वाहनाची सर्व्हिसिंग करून घ्यावी. ज्यांच्याकडे प्रीमियम वाहने आहेत त्यांना सर्व्हिस सेंटरवर कार सर्व्हिसिंग करून घेण्याचा फायदा अधिक आहे. नवीन पिढीची वाहने खूप प्रगत आहेत. हे ECU, इंधन प्रणाली, इग्निशन आणि कारमधील मनोरंजन प्रणाली यांसारख्या इलेक्ट्रॉनिक प्रणालींनी सुसज्ज आहेत. त्यामुळे जर तुम्ही कंपनीने चिन्हांकित केलेल्या सेवा केंद्रात गेलात तर तुम्हाला चांगली सेवा मिळेल याची खात्री बाळगता येईल.

कार विकताना फायदा मिळेलअधिकृत सेवा केंद्रातून तुमची कार सर्व्हिस करून घेण्याचे काही चांगले फायदे आहेत. अधिकृत सेवा केंद्रावर कारची सर्व्हिसिंग केल्याने तुमच्या कारचा इतिहास तयार होतो, ज्याची कार पुनर्विक्री करताना आवश्यकता असते. यामुळे तुम्हाला चांगली किंमत मिळू शकते. 

स्थानिक मेकॅनिकद्वारे सर्व्हिसिंगस्थानिक मेकॅनिक हा कंपनीच्या सर्व्हिस सेंटरपेक्षा कमी दरात वाहनाची संपूर्ण सर्व्हिसिंग करतो. दैनंदिन सेवेत कोणतीही अडचण नाही, अशावेळी तुम्ही स्थानिक मेकॅनिककडे जाऊन खूप पैसे वाचवू शकता. परंतु जेव्हाही तुम्ही स्थानिक मेकॅनिककडून तुमच्या कारची सर्व्हिसिंग करून घेण्यासाठी जाल तेव्हा तुमच्या वाहनात सर्व्हिसिंग करताना लागणारे स्पेअर्स आहेत याची खात्री करा. सुटे भाग, ऑईल आणि फिल्टर हे ओरिजनल असणे आवश्यक आहे.

फायदेस्थानिक मेकॅनिककडून सर्व्हिसिंग केल्याने थेट मजुरीच्या खर्चात बचत होते, जर ओरिजनल स्पेअर्स वापरले गेले तर पार्ट्स आणि तेलाची किंमत सारखीच राहील. परंतु तुमच्या वाहनाची इत्यंभूत माहिती असलेल्या मेकॅनिककडेच जावे. अन्यथा अर्धवट माहिती असलेल्याकडे गेल्यास तुमचा त्रास वाढू शकतो. अनेक कंपन्यांचे तंत्रज्ञान वेगवेगळे असते. सध्या गाड्यांमध्ये सेन्सर येतात. यामुळे त्याचे सॉफ्टवेअर असलेले मेकॅनिक तुमची गाडी चांगली सर्व्हिस करू शकतात. 

टॅग्स :carकार