आजकाल, कार खरेदी करण्यापूर्वी लोक कारसोबत देण्यात आलेल्या सुरक्षिततेसंदर्भातील फीचर्सची माहिती घेताना दिसतात. आता कारमध्ये एअरबॅग्जपासून ते कॅमेरा आणि विविध प्रकारच्या सेन्सरपर्यंत बरेच फीचर्स दिले जातात. जे अपघात टाळतात अथवा अपघात झालाच तर आपला जीव वाचवतात. एवढेच नाही, तर कारमध्ये असलेले काही सेफ्टी फीचर्स, अनेक आजारांपासून आपले संरक्षणही करतात. यासंदर्भात माहिती असणे अत्यंत आवश्यक आहे. असेच एक सुरक्षा फीच म्हणजे, UV कट ग्लास, हे फीचर्स सध्या जवळपास सर्वच कारमध्ये देण्यात येते. हे फीचर अनेक आजारांपासून आपले संरक्षण करते, यांपैकीच एक कॅन्सरही आहे...
आजकाल कारच्या विंडो आणि विंडस्क्रीनसाठी जी ग्लास वापरली जाते, ती UV Cut ग्लास असते. ही ग्लास अतिनील किरणांना कारमध्ये येण्यापासून रोखते, यामुळे कर्करोग आणि इतर अनेक गंभीर आजारांपासून आपले संरक्षण होते. सूर्यप्रकाशात अतिनील किरण अथवा अल्ट्राव्हायोलेट किरण असतात, जे सामान्य डोळ्यांनी दिसू शकत नाहीत. मात्र, या किरणांमुळे आपल्या त्वचेला आणि डोळ्यांना इजा पोहोचू शकते.
यूव्ही कट ग्लास विविध प्रकारच्या किरणांना डिफलेक्ट करतो. या किरणांमुळे आपल्या डोळाची जळजळ, स्किनवर रॅशेस, सनबर्न आणि कँसर सारखे आजार होऊ शकतात. याशिवाय, यूव्ही कट ग्लासची खासियत म्हणजे, हा ग्लास तुटल्यानंतर, छोटे-छोटे गोलाकार तुकडे होतात. यामुळे ती कुणाला टोचण्याचा धोकाही नसतो.
या फीचरमुळे आपली कार अधिक सुक्षित होते. याशिवाय आपम आपल्या कारच्या ग्लासवर यूव्ही कोटिंगदेखील करू शकतात. यामुळे आपल्याला अल्ट्राव्हायोलेट किरणांपासून अधिक सुरक्षितता मिळेल.