शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
4
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
5
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
6
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
7
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
8
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
9
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
10
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
11
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
12
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
13
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
14
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

सावधान...! हे पाच नियम मोडल्यास तीन महिन्यांसाठी लायसन जप्त होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2020 14:58 IST

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर वेगाची मर्यादा ओलांडल्यास टोलनाक्यावर थांबवून हजाराची पावती फाडून लायसन जप्त केले जाते. तसेच हे लायसन तीन महिन्यांसाठी निलंबित केले जाते. असे काही नियम आहेत जे मोडल्यावर लायसन निलंबित करण्यात येतात. 

ठळक मुद्देवाहतुकीचे नियम मोडताच वाहतूक पोलिस हात दाखवून बाजुला थांबण्य़ास सांगतात किंवा कॅमेरा असेल तर डायरेक्ट चलनाची पावती घरी येते. बऱ्याचदा काही कल्पना नसताना वाहतुकीचे नियम अनवधानाने मोडले जातात.

वाहतुकीचे नियम मोडताच वाहतूक पोलिस हात दाखवून बाजुला थांबण्य़ास सांगतात किंवा कॅमेरा असेल तर डायरेक्ट चलनाची पावती घरी येते. पण काही नियम असे आहेत जे तोडल्यास तुमचे लायसन थेट तीन महिन्य़ांसाठी जप्त केले जाऊ शकते. बऱ्याचदा हे माहितीही होत नाही, एखादा अपघात झाल्यास जेव्हा इन्शुरन्स कंपन्या विमा नाकारतात तेव्हा डोक्यावर हात मारायची वेळ येते. 

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर वेगाची मर्यादा ओलांडल्यास टोलनाक्यावर थांबवून हजाराची पावती फाडून लायसन जप्त केले जाते. तसेच हे लायसन तीन महिन्यांसाठी निलंबित केले जाते. असे काही नियम आहेत जे मोडल्यावर लायसन निलंबित करण्यात येतात. बऱ्याचदा शहरामध्ये पदपथांवरून स्कूटर चालविल्या जातात. तर काही ठिकाणी डिव्हायडर उंचीला छोटा असेल तरीही त्यावरून बाईक हाकली जाते. तसेच काहीवेळा कमी उंचीच्या डिव्हायडरवरून कार दुसऱ्या बाजुला वळवली जाते. अशावेळी सापडल्यास लायसन तीन महिन्यांसाठी जप्त होऊ शकते. 

मोटारसायकल किंवा स्कूटर चालवत असताना दोन कारच्या किंवा वाहनांच्यामधून मार्ग काढला जातो. ही ट्रीक नेहमीच फायद्याची असते. मात्र, जर असे करताना स्कूटरचा वेग ठरविलेल्या लेन बदलाच्या वेगापेक्षा जास्त असेल तर लायसन जप्त होऊ शकते. 40 किमीचा वेग मर्यादा असलेल्या रोडवर ठीक आहे. पण हायस्पीडच्या रोडवर असे केल्यास अडकण्याची शक्यता आहे. 

अँबुलन्सला रस्ता रोखल्य़ास तुमचे लायसन निलंबित होऊ शकते. शिवाय नव्या नियमांनुसार 5 ते 10 हजारांचा दंडही होणार आहे. याची तक्रार कोण करणार असा प्रश्न पडला असेल तर सध्याच्या अँम्बुलन्स हायटेक आहेत. तिच्या पुढे आणि पाठीमागे कॅमेरे लावण्यात आलेले आहेत. यामध्ये आढळल्यास चलन फाडले जाऊ शकते. 

सार्वजनिक रोडवर रेसिंग करताना आढळल्यास ट्रॅफिक पोलिस लायसन जप्त करतात. जर तुम्हाला रेसिंगचा छंद असेल तर रेसिंग ट्रॅकवर जावे लागेल. मात्र, तुमच्या शहरात हे ट्रॅक नसतील आणि सामान्य रोडवर कायदा तोडल्यास गुन्हा नोंद होऊ शकतो. जेव्हा वाहन बनविले जाते तेव्हा त्यावर आवाजाच्या नियमांनुसार हॉर्न बसविलेले असतात. मात्र, नंतर काहीजण आवड म्हणून बदलतात. या हॉर्नची आवाजाची मर्यादा ओलांडल्यास लायसन जप्त होऊ शकते. 

टॅग्स :Automobileवाहनroad safetyरस्ते सुरक्षा