शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: ७२ खेळाडूंना मिळाला खरेदीदार, ४६७ कोटींची उलाढाल! कोणता खेळाडू कुठल्या संघात? पाहा यादी
2
लाडक्या बहिणींना मिळणाऱ्या ₹1500 चे लवकरच ₹2100 होणार, मुख्यमंत्री शिंदेंची मोठी घोषणा!
3
IPL Auction 2025: डेव्हिड वॉर्नर ते पियुष चावला... 'हे' खेळाडू राहिले UNSOLD! सर्वच संघांनी फिरवली पाठ
4
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
5
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७.९५ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
6
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरल्या होत्या 363 महिला, किती जिंकल्या? असा राहिला महायुतीचा स्ट्राइक रेट
7
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
8
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
9
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
10
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
11
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
12
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
13
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
14
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
15
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
16
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
17
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
18
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
19
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान

जबरदस्त! देशातील सर्वात स्वस्त CNG कार्स; ४.६६ लाखांपासून सुरू, मिळतंय ३२ किमीचं मायलेज

By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2021 5:43 PM

Cheapest CNG Cars In India : सध्या ग्राहक कार खरेदी करताना त्या कारचा एव्हरेज किती असेल याचा सर्वप्रथम विचार करतात.

ठळक मुद्देसध्या ग्राहक कार खरेदी करताना त्या कारचा एव्हरेज किती असेल याचा सर्वप्रथम विचार करतात.

आजच्या काळात, नवीन कार खरेदी करताना, सर्वात मोठा प्रश्न ग्राहकांच्या मनात येतो, तो म्हणजे  गाडीचे मायलेज किती आहे. सध्या, पेट्रोलच्या वाढत्या किंमतीमुळे जवळजवळ प्रत्येकाला पेट्रोलचा इतर पर्याय शोधण्यास भाग पडत आहे. या प्रकरणात, सीएनजी कार (CNG Cars) सर्वोत्तम पर्याय मानला जातो.

पेट्रोल आणि डिझेलच्या तुलनेत सीएनजीची किंमतही कमी आहे आणि सीएनजीवर चालणाऱ्या कार मायलेजच्या बाबतीतही सर्वोत्तम आहेत. देशात सीएनजी कार्सची विक्री करणाऱ्या अनेक कंपन्या असल्या तरी, मारुती सुझुकीकडे या विभागात सर्वोत्तम आणि मजबूत वाहन पोर्टफोलिओ आहे. आज आम्ही तुम्हाला देशातील टॉप 3 स्वस्त सीएनजी कार बद्दल सांगणार आहोत.

Maruti Wagon R CNG:मारुती सुझुकीची टॉल बॉय हॅचबॅक कार वॅगनआर देखील सीएनजी किटसह विक्रीसाठी उपलब्ध आहे. त्याच्या सीएनजी प्रकारात कंपनीने 1.0 लिटर क्षमतेचे पेट्रोल इंजिन वापरले आहे, जे 58hp पॉवर आणि 78Nm टॉर्क जनरेट करते. यात 60 लिटर क्षमतेची इंधन टाकी आहे. या कारची सुरूवातीची किंमत 5.70 लाख रूपये इतकी आहे. तसेच याचे मायलेजही 32.52 km/kg इतके आहे.

Maruti S-Presso:मारुती सुझुकीची मिनी एसयूव्ही म्हणून ओळखली जाणारी ही कार कंपनी फिट सीएनजी किटसह देखील येते. त्याच्या CNG प्रकारात कंपनीने 1.0 लिटर क्षमतेचे पेट्रोल इंजिन वापरले आहे, जे 67hp ची पॉवर आणि 90Nm ची टॉर्क जनरेट करते. हे इंजिन 5 स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन गिअरबॉक्सशी जोडलेले आहे. यात 55 लिटर क्षमतेचे इंधन टाकी आहे. या कारची सुरूवातीची किंमत 5.06 लाख रुपये इतकी असून ती 31.2 km/kg इतके मायलेज देते.

Maruti Alto CNG:मारुती सुझुकीच्या सर्वात स्वस्त हॅचबॅक कार अल्टोमध्ये कंपनीने 800cc क्षमतेचे पेट्रोल इंजिन वापरले आहे. जे 40hp पॉवर आणि 60Nm टॉर्क जनरेट करते. हे इंजिन 5 स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन गिअरबॉक्सशी जोडलेले आहे. कंपनीचा दावा आहे की त्याचे सीएनजी व्हेरिएंट 31.59 किमी/किलो पर्यंत मायलेज देते. याची इंधन क्षमता 60 लिटर आहे आणि ते दोन व्हेरिअंटमध्ये उपलब्ध आहे. या कारची किंमत 4.66 लाख रुपये इतकी असून ती 31.59 km/kg चं मायलेज देते.

टॅग्स :Maruti Suzukiमारुती सुझुकीPetrolपेट्रोलIndiaभारतcarकार