टाटा मोटर्सनं नुकतीच टियागो हॅचबॅक कारची इलेक्ट्रिक व्हर्जन लॉन्च करण्याची घोषणा केली आहे. आगामी Tiago EV 28 सप्टेंबर रोजी भारतीय बाजारात लॉन्च होणार आहे. रिपोर्ट्सनुसार Tiago EV मध्ये मल्टी-मोड रीजनरेटिव्ह ब्रेकिंग, क्रूझ कंट्रोल आणि स्पोर्ट्स मोड यासारखे अनेक फीचर्स मिळतील. यामुळे आगामी कारची कामगिरी सुधारेल आणि ग्राहकांनाही चांगला अनुभव मिळणार आहे.
आगामी Tiago EV ही टाटा मोटर्सची सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार असू शकते. एकदा र्ण चार्ज झाल्यावर ही कार ३०६ किमी अंतर कापेल. Tiago EV ची संभाव्य वैशिष्ट्ये जाणून घेऊयात.
सिंगल चार्जवर ३०६ km रेंजआगामी Tiago EV चे स्पेसिफिकेशन्सची अधिकृत माहिती अद्याप समोर आलेले नाही. ऑटो वेबसाइट ऑटोकारच्या मते, XPres-T ची एंट्री-लेव्हल मोटर Tiago EV साठी वापरली जाऊ शकते. याला 21.3kWh बॅटरी पॅकसह 213 किमीची रेंज मिळेल. Tigor EV च्या Ziptron पॉवरट्रेन अंतर्गत आगामी इलेक्ट्रिक कार देखील ऑफर केली जाऊ शकते. 26kWh बॅटरी पॅकसह ही कार पूर्ण चार्ज केल्यानंतर 306 किमी रेंज देऊ शकेल.
रिजनरेटिव्ह ब्रेकिंगनं होणार चार्जTiago EV, Tata Motors ची तिसरी इलेक्ट्रिक कार, मल्टी-मोड रीजनरेटिव्ह ब्रेकिंग वैशिष्ट्यासह दाखल होऊ शकते. टाटाने हे फिचर सर्वप्रथम Nexon EV Max मध्ये दिलं आहे. Tata Tigor EV मध्ये हे वैशिष्ट्य नाही, परंतु कंपनी पुढील अपडेट म्हणून याचा समावेश करू शकते. रिजनरेटिव्ह ब्रेकिंगमुळे ग्राहकांना गाडी चालवताना बॅटरी रिचार्ज करता येते. सिंगल-पेडल ड्रायव्हिंगमध्ये रिजनरेटीव्हला हाय लेव्हल मदत मिळेल.
अनऑफिशियल बुकिंग सुरूTata Tigor EV मध्ये क्रूझ कंट्रोल देखील एक उत्तम वैशिष्ट्य म्हणून उपलब्ध असेल. त्याच वेळी, आगामी इलेक्ट्रिक हॅचबॅक कारमध्ये स्पोर्ट्स मोडसह ड्राइव्ह सिलेक्टर डायल देखील उपलब्ध असेल. Tata Tiago EV चे डिझाइन सध्याच्या इंधनावर आधारित Tiago सारखेच असेल. Tiago EV मध्ये इतर EV प्रमाणे ब्लू एक्सेंटचा वापर केला जाऊ शकतो. टाटा मोटर्सच्या काही डीलर्सनी टियागो ईव्हीसाठी अनधिकृतपणे बुकिंग घेणं सुरू देखील केलं आहे.