शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
2
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
3
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
4
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
5
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
6
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई
7
दक्षिणेतील अभिनेत्यांना मुंबईच्या रिअल इस्टेटची भुरळ; वर्षभरात १०० कोटी रूपयांहून अधिक गुंतवणूक
8
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
9
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
10
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
11
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
12
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
13
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
14
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
15
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
16
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
17
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
18
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
19
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
20
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट

बुलेटच्या किमतीत इलेक्ट्रिक कार, मोफत करू शकता बुकिंग!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2024 12:51 PM

Yakuza Karishma EV : हरयाणा स्थित Yakuza EV ने एक नवीन इलेक्ट्रिक कार लाँच केली आहे. 

नवी दिल्ली : सध्या भारतात इलेक्ट्रिक वाहनांची मागणी वाढत आहे. त्यामुळे देश आता इलेक्ट्रिक कारचे केंद्र बनत आहे. यातच टाटा मोटर्स एकामागून एक नवीन इलेक्ट्रिक कार लाँच करत आहेत. तर अनेक ग्राहक टेस्ला कारची वाट बघत आहेत. दरम्यान, हरयाणा स्थित Yakuza EV ने एक नवीन इलेक्ट्रिक कार लाँच केली आहे. 

या कारची किंमत हिरो मोटोकॉर्पच्या करिझ्मा बाईकपेक्षा कमी आहे. जर तुम्ही स्वस्त इलेक्ट्रिक कारसाठी Nano EV ची वाट पाहत असाल तर आता तुम्हाला याची वाट पाहण्याची गरज नाही, कारण Yakuza Karishma EV बाजारात दाखल झाली आहे. ही इलेक्ट्रिक कार 3 सीटर कार आहे, ज्यामध्ये तीन लोक सहज बसू शकतात.

फीचर्सYakuza Karishma ही 3 सीटर इलेक्ट्रिक कार आहे. कारचा लुक आणि डिझाइन ग्राहकांना आकर्षित करू शकते. या इलेक्ट्रिक कारमध्ये एलईडी डीआरएल, प्रोजेक्टर हेडलॅम्प, एलईडी फॉग लॅम्प, ब्रॉड ग्रिल, क्रोम डोअर हँडल, कनेक्टेड एलईडी टेल लॅम्प, पॉवर विंडो, बॉटल होल्डर यांसारखे फीचर्स आहेत. याशिवाय तुम्हाला सनरूफ, पुश स्टार्ट/स्टॉप बटण, स्पीकर्स, ब्लोअर, इन्स्ट्रुमेंट डिस्प्ले, रिव्हर्स पार्किंग कॅमेरा यांसारखी फीचर्स सुद्धा मिळतील.

बॅटरी आणि रेंजYakuza Karishma EV कारला 60v42ah बॅटरीमधून पॉवर मिळते. एकदा फुल चार्ज केल्यानंतर ही कार 50-60 किलोमीटर अंतर कापू शकते. ही कार 0 ते 100 टक्के चार्ज होण्यासाठी 6-7 तास लागतील. इलेक्ट्रिक कार चार्ज करण्यासाठी टाइप 2 चार्जर मिळेल. या इलेक्ट्रिक कारचे बुकिंग सुरू झाले असून, कंपनीच्या अधिकृत साइटवर जाऊन बुकिंग करता येईल.

बाईकपेक्षा स्वस्त इलेक्ट्रिक कारHero Karizma XMR ची भारतात एक्स-शोरूम किंमत 1.79 लाख रुपयांपासून सुरू होते. Yakuza Karishma ची किंमत बाईकपेक्षा कमी असल्याचे तुम्ही पाहू शकता. जर ग्राहकांना ही कार खरेदी करायची असेल तर ते Yakuza EV च्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन बुकिंग करू शकतात. 

टॅग्स :Electric Carइलेक्ट्रिक कारAutomobileवाहनcarकार