भारतीय बाजारात हळू हळू फ्रान्सची कंपनी पाय रोवत आहे. कंपनीने सिट्रोएन सी3 कार खपविण्यासाठी भलामोठा डिस्काऊंट देण्याची क्लुप्ती टाळली आहे. गेल्या वर्षीच्या कारवर काही डिस्काऊंट दिला जात आहे. याचा परिणाम कारच्या विक्रीवर होत आहे. असे असताना गेल्या महिन्यात सिट्रॉएन सी ३ ची १११ युनिट्स विकल्या गेल्या आहेत.
Citroen C3 Review: सिट्रॉइन C3 रिव्ह्यू: सात लाखांत एसयुव्हीची मजा की सजा? नवा पर्याय वापरायचा की...यातच कंपनीने आज सिट्रॉएनच्या किंमतीत वाढ केली आहे. कालच कंपनीने पहिली इलेक्ट्रीक कार बाजारात उपलब्ध केली होती. यानंतर लगेचच या कारच्या आयसीई व्हेरिअंटच्या किंमतीत वाढ केली आहे. सिट्रॉएन सी 3 च्या किंमतीत कंपनीने १८००० रुपयांची वाढ केली आहे. यामुळे या कारची सुरुवातीची किंमत 6.16 लाख रुपये (एक्स शोरूम) झाली आहे.
Citroen C3 Live ची किंमत रु. 6.16 लाखCitroen C3 Feel ची किंमत 7.08 लाख रुपये आहे.Citroen C3 Feel Vibe ची किंमत 7.23 लाख रुपये आहे.Citroen C3 Feel DT ची किंमत 7.23 लाख रुपये आहे.Citroen C3 Feel Vibe DT ची किंमत 7.38 लाख रुपये आहे.Citroen C3 Feel Turbo DT Vibe च्या किंमतीत कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही.
कारचा खप किती? फेब्रुवारी महिन्यात या कारची विक्री 111 यूनिट झाली. तर जानेवारीत 788 यूनिट कार विकल्या गेल्या होत्या. २०२२ च्या म़ॉडेलवर कंपनी ४५ हजारांचा डिस्काऊंट देत होती.