फ्रान्सची ऑटो कंपनी Citroen भारतात पाय रोवू पाहत आहे. अत्यंत बेसिक गोष्टी देत या कंपनीने कार बाजारात आणल्या आहेत. परंतु, त्यांच्या या जुनाट फिचर्सनंतर आता या कारला सेफ्टी रेटिंगनेही धक्का दिला आहे. सिट्रॉएन C3 च्या ईव्ही कारला ग्लोबल एनकॅपमध्ये भोपळा मिळाला आहे.
भारतात सर्वाधिक खपाच्या कार असलेली कंपनी मारुती सुझुकीच्या बहुतांश कारना झिरो स्टार सेस्टी रेटिंग मिळालेली आहे. यानंतर आता सिट्रॉएन या कंपनीचा नंबर लागला आहे. यामुळे कंपन्या ग्राहकांच्या सुरक्षेकडे लक्ष देत नसल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. टाटा, महिंद्रा, फोक्सवॅगन, स्कोडा नंतर आता ह्युंदाईनेही फाईव्ह स्टार रेटिंगच्या कार बाजारात आणल्या आहेत.
सिट्रॉएन सी३ या कारला दोन्ही अॅडल्ट आणि चाईल्ड ऑक्युपंट प्रोटेक्शन कॅटॅगरीमध्ये झिरो रेटिंग मिळाली आहे. ग्लोबल एनकॅप सेफर कार्स फॉर इंडिया कँपेन अंतर्गत या कारची क्रॅश टेस्ट करण्यात आली होती. या कारमध्ये ड्युअल फ्रंट एअरबॅग्ज, बेल्ट लोड लिमिटर आदी फिचर्स देण्यात आली आहेत. तसेच इलेक्ट्रोनिक स्टैबिलिटी कंट्रोल, सीट बेस्ट प्रीटेंशनर्स, साइड एयरबैग्स, आइसोफिक्स एंकरेजेज, मागील सीटवर बेल्ट रिमाइंडर आदी देण्यात आले आहे.
Citroen eC3 ला अॅडल्ट सेफ्टी चाचणीत एकूण 34 पैकी केवळ 20.86 गुण मिळाले. तर बालकांच्या सेफ्टी टेस्टमध्ये 49 गुणांपैकी केवळ 10.55 गुण मिळाले आहेत.