पेट्रोल, डिझेलच्या वाढत्या किंमतींमुळे (Petrol, diesel Price hike) ग्राहकांची सीएनजी कारना (CNG Car) पसंती वाढू लागली आहे. मारुतीने गेल्या वर्षीपासून डिझेलच्या कार बनविणे बंद केले आहे. यामुळे मारुतीच्या ताफ्यात पेट्रोल आणि सीएनजीच्या कार आहेत. यामध्ये आता आणखी एका कारची भर पडणार आहे. मारुती सुझुकी कॉम्पॅक्ट सेदान कार डिझायरचा सीएनजी व्हेरिअंट लाँच करण्याच्या तयारीत आहेत. (Maruti Dzire CNG varient spotted, launched soon in Indian market.)
आली BMW ची नवी Electric Scooter; जबरदस्त फीचर्ससह मिळणार १३० किमीची रेंज
कंपनीच्या पोर्टफोलिओमध्ये S-Presso, अर्टिगा, अल्टो 800 आणि इको, वॅगन आर, सेलेरिओ या कार कंपनी फिटेड सीएनजीसोबत येतात. आता कंपनी डिझायर कारही सीएनजी व्हेरिअंटमध्ये आणणार आहे. कदाचित स्विफ्टदेखील सीएनजी व्हेरिअंटमध्ये येण्याची शक्यता आहे. डिझायर सीएनजी मॉडेलचे टेस्टिंग करताना पाहिली गेली आहे.
कंपनीला डिझायरच्या डिझेल मॉडेलमध्ये मोठे नुकसान झाले होते. यामुळे आता कंपनी नव्या पर्यायाचा विचार करत आहे. पेट्रोल आणि डिझेल कार सीएनजीपेक्षा जास्त ताकद देते. मात्र, सीएनजी जास्त मायलेज देते. सीएनजी कार चालविण्याचा खर्च देखील कमी असतो. यामुळे लोकांचा ओढा हा सीएनजी कारकडे वळला आहे. आता सीएनजी पंपांची संख्यादेखील वाढत आहे.
Two Wheeler Price Hike: रातोरात वाढल्या स्कूटर, मोटारसायकलींच्या किंमती; जाणून घ्या...
मीडिया रिपोर्टनुसार मारुती 2021-2022 या आर्थिक वर्षात सीएनजीच्या एकून 2.5 लाख युनिट बाजारात आणणार आहे. नवीन सीएनजी डिझायरदेखील लवकरच बाजारात येऊ शकते. यानंतर कंपनी स्विफ्टच्या सीएनजी व्हेरिअंटवर देखील काम सुरु करणार आहे. डिझायरची थेट टक्कर ह्युंदाई ऑरा सीएनजी कार सोबत असणार आहे. भविष्यात फोर्डदेखील सीएनजी कार आणणार आहे. टाटा देखील टिगॉरमध्ये सीएनजी देण्याची तयारी करत आहे.