कार कंपन्यांनी ऑक्टोबर महिन्यात आपल्या गाड्यांची जबरदस्त विक्री केली. दिवाळीनिमित्त ग्राहकांनी मोठ्या प्रमाणावर वाहन खरेदी केली आहे. सध्या मारुती सुझुकी ही देशातील सर्वाधिक कार विकणारी कंपनी आहे. दुसऱ्या क्रमांकावर ह्युंदाई आहे. तर टाटा मोटर्सचा तिसरा क्रमांक लागतो.
मारुती सुझुकीची अल्टो ही पुन्हा एकदा देशातील सर्वाधिक विकली जाणारी कार ठरली आहे. गेल्या महिन्यात या कारच्या 21,260 युनिट्सची विक्री झाली होती. तर मारुती सुझुकी वॅगनआर ही दुसऱ्या क्रमांकावर आहे. तथापि, कंपनीची आणखी एक कार आहे, जीची सीएनजी व्हेरिअंटमध्ये आल्यानंतर, जबरदस्त विक्री होत आहे.
या कारचं नाव आहे, मारुती सुझुकी स्विफ्ट (Maruti Suzuki Swift). या कारच्या विक्रीत अचानक वाढ झाली आहे. विशेष म्हणजे, या कारला फेसलिफ्ट अपडेटही मिळालेले नाही. यात कारमध्ये केवळ सीएनजीचा पर्याय जोडण्यात आला आहे. असे असतानाही ऑक्टोबर 2022 मध्ये या कारच्या तब्बल 17,231 युनिट्सची विक्री झाली आहे.
गेल्या वर्षीचा विचार करता, गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात या कारच्या केवळ 9,180 युनिट्सचीच विक्री झाली होती. ऑक्टोबर 2022 च्या टॉप 10 वाहनांमध्ये स्विफ्ट तिसऱ्या क्रमांकावर आहे. केवळ सीएनजी पर्याय देण्यात आल्यानेच या कारच्या विक्रीने ही उसळी घेतल्याचे मानले जात आहे.
किंमत आणि मायलेज -मारुती स्विफ्टची किंमत 5.92 लाख रुपयांपासून 8.85 लाख रुपयांपर्यंत (एक्स-शोरूम) जाते. या कारमध्ये 1.2-लीटर डुअल जेट पेट्रोल इंजिन (90PS आणि 113Nm) मिळते. या कारमध्ये 5-स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन आणि 5-स्पीड एएमटी गिअरबॉक्सचा पर्याय उपलब्ध आहे. या कारमध्ये सीएनजी किटचीही सुविधा देण्यात आली आहे. ही कार सीएनजीसह 30KM हून अधिकचे मायलेज देते.