भारतात विविध रस्त्यांवर असणाऱ्या गतीअवरोधक अर्थात स्पीडब्रेकर्सना एकसारखेपणा नाही. अगदी एकाच भागात असणारे हे स्पीडब्रेकर्स वेगळ्या वेगळ्या आकाराचे, प्रकाराचे दिसतात. त्यामुळे हा स्पीडब्रेकर पार करताना वेगळ्यावेगळ्या पद्धतीने कार न्यावी लागते, वाहन न्यावे लागते. काही स्पीडब्रेकर हे कमी उंचवटे, जास्त उंचवटे, रम्बलिंग स्ट्रीप्ससारखे असे असल्याने हे गतीअवरोधक ओलांडताना अतिशय भिन्न पद्धतीने पार करावे लागतात. मुळात हे गतीअवरोधक ओलांडताना काही असले तरी तुमच्या वाहनाचा वेग आधीच नियंत्रणात आणणे, वेग कमी करणे साधारण ताशी प्रति किलोमीटर १० ते २० इतका वेग ठेवणे. यामुळे सुरक्षितता हा मुद्दाही सांभाळला जातो व तुमच्या कारची वा वाहनाची स्थिती चांगली राहाण्यासाठीही मदत होते.
स्पीडब्रेकर कसा ओलांडावा ही एक कला आहे, असे म्हटले तर चूक ठरणार नाही. महामार्गांवर तुमची कार साधारण ६० ते ९० किलोमीटर वेगाने धावत असते. रस्त्यामध्ये अनेक प्रकारचे अवरोध असतात. तसेच मध्ये येणारी गावे, नाके, कठीण वळणे वा अपघातस्थळे अशा ठिकाणी हे अगती अवरोधक जाणीवपूर्वक बसवलेले असतात. ते पुढे आहेत, याचे संकेत देणारे फलकही असतात. ते वाचले गेले पाहिजेत, मोठ्या रस्त्यावर ड्रायव्हिंग करताना हे सारे संकेत व त्याचा अर्थ तुमच्या मेंदूपर्यंत पोहोचताच तशी क्रिया वा वर्तन तुमच्याकडून आपोआप घडायला हवे. ते तुमच्या सुरक्षित वाहनचालकाचे गमकच आहे.
स्पीडब्रेकर पुढे आहे याचा संकेत मिळताच वाहनाचा वेग हळू करून त्यानुसार गीयर बदलून स्पीडब्रेकरवरून कार वा वाहन पाहर करताना तुमच्या वा तुम्च्या कारमध्ये बसलेल्या प्रवाशांच्या पोटातील पाणी हलणार नाही, इतक्या कमी वेगाने स्पीडब्रेकर पार करावा. यामुळे वाहतूक, पादचारी आदींच्या सुरक्षिततेबरोबरच तुमच्या वाहनाला बसणारे अनावश्यक धक्के कमी होतात. तुमच्या कारचे वा वाहनाचे आयुष्यही वाढते. सातत्याने हे वर्तन करणे हे यासाठी महत्त्वाचे आहे. यामुळे तुमच्या कारचे वा वाहनाचे टायर्स चांगले राहातात, त्याची रिम्स चागली टिकतात, सस्पेंशन, शॉकअॅब्सॉर्बर्स, गाडीच्या बांधणीमधील नटबोल्टची ठिकाणे, दरवाजे या सा-या घटकांचे नुकसान कमी होते, किंबहुना अयोग्य पद्धतीने स्पीडब्रेकर सतत पार करणा-या कारमधून कालांतराने आवाज येणे वा अन्य त्रास सुरू होणे या बाबी सुरू होतात, ते सारे टाळण्यासाठी तुमच्या वाहनाला स्पीडब्रेकरवरून पार करताना सुनियंत्रित वेगात आणून कमी वेगात पार करा.
योग्य वेळी योग्य पद्धतीने गीयर बदलून ड्रायव्हिंग करा. स्पीडब्रेकर हा घटक केवळ लोकांच्या वा पादचा-यांच्याच नव्हे तर तुमच्या व तुमच्या कारच्या भल्यासाठीही तुम्हाला आवर घालत असतो हे नक्की.