नवी दिल्ली : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे टाटा मोटर्सने जगभरातील आपल्या व्यावसायिक वाहन ग्राहकांसाठी वॉरंटीमध्ये वाढ केलेली आहे. कंपनी या आव्हानात्मक काळामध्ये वाहने धावती ठेवण्याच्या उद्देशाने तंत्रज्ञान पाठिंबा देण्याकरिता त्यांच्या सर्वोत्तम क्षमतांनुसार देखील काम करत आहे. व्यावसायिक वाहन ग्राहकांसाठी सेवा विस्तारीकरणाचा भाग म्हणून टाटा मोटर्स भारतातील त्यांच्या ग्राहकांसाठी महत्त्वाचे फायदे देणार आहे. राष्ट्रीय लॉकडाऊन कालावधीदरम्यान नियोजित असलेल्या पूर्वीच्या मोफत सर्व्हिसेससाठी दोन महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली आहे. तसेच राष्ट्रीय लॉकडाऊन कालावधीदरम्यान वॉरंटी संपणा-या ग्राहकांसाठी वॉरंटी कालावधीमध्ये दोन महिन्यांची वाढ केलेली आहे.मुदत संपणा-यांनाही टाटा मोटर्सनं दिलासा देण्याचा प्रयत्न केला असून, टाटा सुरक्षा एएमसीमध्ये वाढ केलेली आहे, टाटा मोटर्स सुरक्षामधील सर्व सक्रिय करारांसाठी एक महिन्याची वैधता वाढवलेली आहे. नियोजित पूर्वीचे एएमसी सेवा लाभ मिळावे, या हेतूनं टाटा मोटर्सनं ग्राहकांकरिता एक महिन्याची मुदतवाढ दिलेली असून, सरकारने दिलेल्या आदेशानुसार आवश्यक वस्तूंची ने-आण करणा-या ट्रकांसाठी टाटा मोटर्स हेल्पलाइन, टाटा सपोर्ट - १८०० २०९ ७९७९ देखील सक्रियपणे सुरू राहणार आहेत. तसेच टाटा मोटर्स प्रमाणित वॉरंटी अटी व नियमांनुसार त्यांच्या जागतिक व्यावसायिक वाहन ग्राहकांच्या वॉरंटी कालावधीमध्ये देखील वाढ करणार आहे. दक्षिण आफ्रिका, आखाती देश, नेपाळ, भूतान, श्रीलंका, वायव्य आफ्रिकन देश व लॅटॅम (लॅटिन अमेरिका) देशांमधील वाहनांवर १५ मार्च २०२० नंतर वॉरंटी संपणा-या ग्राहकांसाठी वॉरंटी कालावधीमध्ये दोन महिन्यांची वाढ करण्यात आली आहे.बांगलादेशमधील वाहनांवर २० मार्च २०२० नंतर वॉरंटी संपणा-या ग्राहकांसाठी आणि श्रीलंकेमधील वाहनांवर १५ मार्च २०२० नंतर वॉरंटी संपणा-या ग्राहकांसाठी वॉरंटी कालावधीमध्ये दोन महिन्यांची वाढ केलेली आहे. टांझानिया, झांबिया, मोझांबिक, केनिया, युगांडा, झिम्बाब्वे, म्यानमार, मलेशिया, फिलीपाइन्स, व्हिएतनाम, थायलंड, इंडोनेशियामधील वाहनांवर १ एप्रिल २०२० नंतर वॉरंटी संपणा-या ग्राहकांसाठी वॉरंटी कालावधीमध्ये दोन महिन्यांची वाढ दिलेली आहे.
Coronavirus: लॉकडाऊनमध्ये टाटा मोटर्सकडून जगभरातील ग्राहकांना मोठी सवलत; मिळणार महत्त्वाचे फायदे
By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2020 4:34 PM