तुम्हाला मायलेजही हवे, कारही चांगली मोठी एसयुव्ही लुकवाली हवी आणि सेफ्टी देखील हवी... या तीन गोष्टी अनेकांच्या मनात घोळत असतात. सुरुवातीपासूनच फक्त पेट्रोल आणि पेट्रोलवर खेळणाऱ्या कार निर्माता कंपनीने मध्यंतरीच्या काळात काही कार डिझेलमध्येही आणल्या होत्या. परंतू, त्यात काही जम बसला नाही. आताही तशी फारशा प्रकाशझोतात नसलेल्या परंतू एकेकाळी श्रीमंतीचा आयकॉन ठरलेल्या होंडाने एका एसयुव्हीच्या लाँचिंगची तयारी सुरु केली आहे.
Honda Elevate च्या किंमतीचा नाही तर मायलेजचा खुलासा झासला आहे. ही कार किया सेल्टॉस आणि ह्युंदाई क्रेटाला टक्कर देण्यासाठी बाजारात आणण्यात येणार आहे. लवकरच या कारच्या किंमतीचा खुलासाही होणार आहे.
कंपनी दोन वेगवेगळ्या पॉवरट्रेन पर्यायांसह Honda Elevate भारतीय बाजारात आणणार आहे. कंपनीने 1.5-लीटर पेट्रोल इंजिन वापरले आहे जे 121Hp पॉवर आणि 145Nm टॉर्क जनरेट करते. हे इंजिन 6-स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन गिअरबॉक्ससह येते. याशिवाय हे इंजिन 7-स्पीड CVT ऑटोमॅटिक ट्रान्समिशनसह देखील दिले जाणार आहे. हेच इंजिन होंडा सिटी सेडान कारमध्ये वापरण्यात येत आहे.
- Elevate चे मॅन्युअल व्हेरियंट 15.31 kmpl चे मायलेज देते.
- एलिव्हेटचे ऑटोमॅटिक व्हेरियंट 16.92 kmpl चे मायलेज देते.
Honda ने केलेल्या दाव्यानुसार मॅन्युअल गिअरबॉक्स वेरिएंट 15.31 kmpl पर्यंत आणि CVT प्रकार 16.92 kmpl पर्यंत मायलेज देतो. 40-लिटरची इंधन टाकी देण्यात आली आहे. म्हणजेच जर मायलेजचे गणित घातल्यास मॅन्युअल व्हेरिएंट पूर्ण टाकीमध्ये 612 किमी पर्यंत अंतर कापू शकते, तर अॅटोमॅटीक व्हेरिअंट 679 किमी अंतर कापू शकते. आता हे कंपनीने क्लेम केलेले मायलेज आहे. यात रस्त्यावरील खऱ्या परिस्थितीतील मायलेज वेगळे असू शकते. अनेकदा मायलेज हे प्रत्येक चालकाच्या सवय़ीनुसार वेगवेगळे देखील येते.