गेल्या काही महिन्यांपासून चर्चेत असलेली एकेकाळची प्रसिद्ध एयुव्ही GMC Hummer इलेक्ट्रीकमध्ये येत आहे. 3 एप्रिलला ती जगभरात लाँच होणार आहे. एक वेळ अशी होती जेव्हा या हमरला (Hummer) श्रीमंत आणि प्रसिद्ध व्यक्तींनी डोक्यावर उचलून धरले होते. मात्र, या हमरचे इंजिन एवढ्या मोठ्या प्रमाणात इंधन खायचे की हळूहळू या हमरचा बाजार थंड पडला होता. (GMC announced this week that the Hummer EV will be launch on 3rd April.)
आता हमरची इलेक्ट्रीक एसयुव्ही येत आहे. यामुळे ही एसयुव्ही पुन्हा एकदा या लोकांच्या पसंतीस उतरण्याची शक्यता आहे. तसेच विजेवर असल्याने परवडणारी तसेच पर्यावरणपूरक ठरणार आहे.
हमर तीन एप्रिलला बाजारात लाँच होणार आहे. जीएसीने घोषणा केली आहे की, या इलेक्ट्रीक वाहनाची बुकिंग याच दिवसापासून सुरु केली जाणार आहे. सध्या अमेरिकन बाजारात एसयुव्ही आणि पिकअप ट्रकची मागणी मोठी वाढली आहे. Hummer SUV EV त्या लोकांना आवडू शकते जे बॅटरीवर चालणाऱ्या एका ताकदवान एसयुव्हीचा पर्याय शोधत आहेत. यामुळे Hummer EV पिकअपमध्ये देखील उपलब्ध होणार आहे. पिकअपला 1,000 hp ची ताकद देण्यात आली आहे. जी केवळ 3 सेकंदात 100 किमीचा वेग पकडते, असा दावा कंपनीने केला आहे. तसेच बॅटरी पॅक 560 किमीची रेंज देत असल्याचा दावा केला आहे.
डिझाईन आणि लूकHummer इलेक्ट्रिक एसयूवी ही पिकअप फॉर्मवर आधारित असल्याने पाठीमागचा फ्लॅट बेड कार्गो बंद करण्यात आला आहे. मागच्या दरवाजात फुल साईज स्पेअर व्हील देण्यात येणार आहे. लीक झालेल्या फोटोंनुसार Hummer एसयूवी ईव्हीमध्ये पिकअप सारखाच सी पीलर देण्यात आला आहे. मात्र ही कार लांब रूफ आणि जास्त बॉडीवर्कसोबत येईल.
खेकड्याची चाल...
Hummer EV ही पाणी, वाळवंट, चिखल आणि ओबडधोबड जमिनीवरून मार्गक्रमण करण्याची क्षमता ठेवते. एसयुव्हीचा सेंटर ऑफ ग्रॅव्हीटी खूप खाली देण्यात आला आहे. अंडरबॉडी कॅमेरा, क्रॅब मोड सारखे भन्नाट फिचर देण्यात आले आहे. क्रॅब मोड म्हणजेच खेकड्यासारखी वाकडी चालविता येणार आहे. हे एक अनोखे फिचर या एसयुव्हीला पुन्हा एकदा जगप्रसिद्ध बनविण्यास उपयुक्त ठरणार आहे.