सणासुदीच्या काळात अनेक कंपन्या आपल्या प्रोडक्ट्सवर ऑफर्स देतात. कार उत्पादक कंपन्या देखील सणासुदीच्या काळात आपल्या कारवर अनेक ऑफर्स देताना दिसून येतात. सध्या रेनॉल्टने (Renault) आपल्या कारवर ऑफर आणल्या आहेत. रेनॉल्टने आपल्या कारवर डिस्काउंट ऑफर जाहीर केल्या आहेत. या ऑफरमध्ये कॅश डिस्काउंट, एक्सचेंज बेनिफिट आणि कॉर्पोरेट डिस्काउंट यांचा समावेश आहे. कंपनीने 50,000 रुपयांपर्यंतच्या ऑफर आणल्या आहेत. या ऑफर फक्त सप्टेंबर महिन्यासाठी आहेत.
रेनॉल्ट क्विडया महिन्यात रेनॉल्ट आपल्या क्विड (Kwid) हॅचबॅकवर 35,000 रुपयांचे बेनिफिट्स देत आहे. एंट्री-लेव्हल हॅचबॅकवर 10,000 रुपयांचा कॅश डिस्काउंट, 10,000 रुपयांचा कॉर्पोरेट डिस्काउंट आणि 15,000 पर्यंत एक्सचेंज बेनिफिट (ऑफर केलेल्या व्हेरिएंटवर) दिले जात आहेत. दरम्यान, कार अनेक व्हेरिएंटमध्ये विकली जाते, ज्यामध्ये 800cc इंजिन आणि 1.0-लिटर इंजिन समावेश आहे. यात मॅन्युअल गिअरबॉक्स आणि AMT चा ऑप्शन मिळतो.
रेनॉल्ट ट्रायबररेनॉल्ट ट्रायबरवर 50000 रुपयांपर्यंतच्या ऑफर्स आहेत. यामध्ये 25,000 रुपयांची एक्सचेंज डिस्काउंट, 15,000 रुपयांचा कॅश डिस्काउंट आणि 5000 रुपयांचा अतिरिक्त डिस्काउंटचा समावेश आहे. मात्र, कारच्या नवीन मॉडेलवर केवळ 35,000 रुपयांची ऑफर आहे. यामध्ये 10,000 रुपयांचा कॅश डिस्काउंट आणि 25,000 रुपयांचा एक्सचेंज बेनिफिट आहे. दरम्यान, रेनॉल्ट ट्रायबर एक MPV आहे. यात 1.0-लिटर पेट्रोल इंजिन आहे.
रेनॉल्ट कायगररेनॉल्ट कायगरवर 10,000 कॉर्पोरेट डिस्काउंट, 10,000 रुपयांची रुरल ऑफर आणि स्क्रॅपेज प्रोग्राम अंतर्गत तुम्हाला 10,000 रुपयांपर्यंतचे एक्सचेंज बेनिफिट्स दिले जात आहेत. मात्र, या SUV वर कॅश डिस्काउंट दिले जात नाही. दरम्यान, रेनॉल्ट कायगर SUV ला 1.0-लीटर टर्बो पेट्रोल आणि 1.0-लीटर नॅच्युरली एस्पिरेटेड अशा दोन इंजिनांचा ऑप्शन मिळतो. यात मॅन्युअल आणि CVT गिअरबॉक्सचा ऑप्शनही मिळतो.