स्कूटर ही आज सर्वसामान्य लोकांचे दैनंदिन वाहतुतीचे एक साधनच बनली आहे, इतकेच नव्हे तर चालवायला सोपी, महिलांनाही हाताळायला सोपी असणारी, पूर्वीच्या तुलनेत वजनाला हलकी असलेली, ऑटो गीयरची ही स्कूटर आहे. मात्र स्कूटरचा एकूण विचार करता अगदी भरपूर अनुभवी असलेल्या स्कूटर चालकाला एकेकाळी देखभालूच्या छोट्या समस्येसाठीही स्वतः काम करून ती सोडवण्याची असणारी सवय या नव्या तंत्राच्या स्कबटरबाबत मात्र कामाला येणारी नाही. स्कूटरची गेल्या काही काळात वाढलेली संख्या पाहिली तर त्या तुलनेत कंपनीची सर्व्हिस सेंटर्स मात्र तुटपुंजी आहेत. अनेक कंपन्याच्या स्कूटरच्या सुट्या भागाच्या किंमती तुलनेत जास्त असून अनेक भागात सुटे भाग मिळतही नाहीत. इतकेच कशाली सर्व्हिस सेंटर्समध्येही महत्त्वाचे सुटे भाग नसले तर काहीवेळा कंपनीतून मागवून घेण्यात आठवडा— दीड आठवडा लागतो.
एकूणच चालवायला सोप्या केलेल्या या स्कूटरसाठी स्वतः वेळ देणे गरजेचे असले तरी स्वतःला त्या स्कूटरची केबल बदलणेही कठीण होते. तंत्रविकासाच्या व फायद्याच्या वा मार्केटिंगच्या धोरणामुळे स्कूटर मेंटेन करणे सहजसाध्य नाही. किमान दहा स्क्रू उघडल्याविना स्कूटरचे पॅनेल ओपन होत नाही. हेडलॅम्पमधील बल्ब बदलायचा असला तरी त्यात बऱ्यापैकी वेळ जातो.
साइड इंडिकेटर, टेललॅम्प याचे बल्ब बदलण्यासही चांगला वेळ द्यावा लागतो. ब्रेक केबल बलायची तर पूर्ण बाह्य आवरणासह म्हणजे आऊटरसह बदलावी लागते. ती बदलणे अवघड काम. त्यासाठी वेळ जास्त जातो तो व्गळाच. यामुळे लांबच्या प्रवासात पूर्वी स्कूटरचा वापर होत असे तो कमी झाला आहे. तशात अनोळखी ठिकाणी मेकॅनिक मिळेल, तो कसा असेल व त्याच्याकडे सुटे भाग दर्जेदार सोडा पण मिळतील का येथपासून काळजी.
यामुळे अनेक स्कूटर चालक स्कूटर ठप्प पडली तर त्यांना वेळ देण्याविना पर्याय नसतो. सेवा क्षेत्रातील साध्या कामाच्या माणसांना तर यामुळे खूप त्रास होतो. पण एकंदर कंपन्याच्या धोरणांमुळे स्कूटरचे हे सोपे चालन देखभालीसाठी मात्र वेळ व चलन गमावणारे ठरत आहे.