भारतीय बाजारात टोयोटाकारची मागणी सातत्याने वाढताना दिसत आहे. टोयोटाच्या 8-सीटर एमपीव्ही इनोव्हा हायक्रॉसची सध्या भारतीय बाजारात धूम सुरू आहे. या कारच्या विक्रीत जबरदस्त ग्रोथ दिसत आहे. इनोव्हा हायक्रॉसची बुकिंग सुरू होताच ग्राहक हिच्या हायब्रिड व्हेरिअंटवर तुटून पडले आहेत. महत्वाचे म्हणजे, वाढती बुकिंग पाहता, कंपनीला हिच्या काही व्हिरिअंटची बुकिंग काही दिवसांसाठी बंद करावी लागली आहे. टोयोटाची ही एमपीव्ही सध्या कंपनीच्या मोस्ट डिमांडिंग कारपैकी एक आहे. कंपनीच्या याच हायब्रिड व्हेरिअंटवर सध्या मोठा वेटिंग पिरिअड सुरू आहे. विशेष म्हणजे, टोयोटाचे हे एकमेव मॉडेल आहे, ज्याचा वेटिंग पिरिअड सर्वाधिक म्हणजेच 14 महिने एवढा आहे.
हायक्रॉसचा वेटिंग पिरिअड -टोयोटा इनोव्हा हायक्रॉसच्या बेसिक व्हेरिअंटसंदर्भात बोलायचे झाल्यास, ही कार घरी आणण्यासाठी ग्राहकांना 14 महिन्यांपर्यंत वाट बघावी लागेल. जून 2024 मधील बुकिंगच्या दिवसापासूनही या 8-सीटर पेट्रोल एमपीव्हीवर 6 महिन्यांपर्यंतचा वेटिंग पिरअड सुरू आहे. तर, हिच्या हायब्रिड व्हेरिअंटवर बुकिंगच्या दिवसापासून जवळपास 14 महिन्यांचे वेटिंग सुरू आहे. सध्या, कंपनीने हायब्रिड व्हेरिअंट ZX आणि ZX(O) ची बुकिंग काही काळासाठी बंद केली आहे. यामुळे हिचा वेटिंग पिरिअड क्लियर नाही.
किती आहे किंमत? -या 8-सीटर एमपीव्ही इनोव्हा हायक्रॉसच्या किंमतीसंदर्भात बोलायचे झाल्यास, भारतीय बाजारात हिच्या बेस मॉडलची किंमत 19.77 लाख रुपये (एक्स-शोरूम) पासून सुरू होते. आणि टॉप मॉडेलची किंमत 30.98 लाख रुपयांपर्यंत (एक्स-शोरूम) जाते.
मायलेज आणि स्पीड -टोयोटा इनोव्हा हायक्रॉसच्या स्ट्रॉन्ग हायब्रिड व्हेरिअंटचे मायलेज 21.1 किमी. प्रति लीटर एवढे आहे. ही 8-सीटर एमपीव्ही 0 ते 100 किमी. प्रति तास एवढा स्पीड केवळ 9.5 सेकेंदांत घेते.
या कारमध्ये 10-इंचांचा रिअर पॅसेन्जर डिस्प्ले, 10-इंचांचा टचस्क्रीन इंफोटेनमेंट डिस्प्ले, ड्यूल झोन क्लायमेट कंट्रोल, डिजिटल ड्रायव्हर डिस्प्ले, व्हेंटिलेटेड सीट्स, पॅनोरमिक सनरूफ, 360-डिग्री कॅमरा, वायरलैस फोन चार्जिंग आणि कनेक्टेड कार टेक्नॉलॉजी सारखे बरेच खास फीचर्स देण्यात आले आहेत.