शहरं
Join us  
Trending Stories
1
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
2
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
3
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
4
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
5
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
6
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
7
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
8
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
9
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
10
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
11
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
12
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
13
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
14
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
15
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
16
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
17
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
18
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
19
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
20
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 

सायरस मिस्त्रींच्या अपघाताचा परिणाम, आता सीट बेल्ट अलार्म स्टॉपरवर बंदी; सरकार कठोर भूमिकेच्या तयारीत!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 06, 2022 2:47 PM

टाटा ग्रूपचे माजी चेअरमन सायरस मिस्त्री यांच्या अपघाती मृत्यूनंतर आता पुन्हा एकदा रस्ते वाहतुकीत प्रवाशांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.

नवी दिल्ली-

टाटा ग्रूपचे माजी चेअरमन सायरस मिस्त्री यांच्या अपघाती मृत्यूनंतर आता पुन्हा एकदा रस्ते वाहतुकीत प्रवाशांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. रिपोर्टनुसार मिस्त्री यांच्या मृत्यूचं सर्वात मोठं कारण म्हणजे त्यांनी सीट बेल्ट लावला नसल्याचं सांगितलं जात आहे. यामुळे केंद्र सरकारला सीट बेल्ट आणि सीट बेल्ट वॉर्निंग सिस्टमशी संबंधित नियमांवर पुनर्विचार करण्यास भाग पाडलं आहे. सीट बेल्ट वॉर्निंग सिस्टीम बंद करणाऱ्या सर्व जुगाडांवर सरकार लवकरच बंदी घालू शकतं. भारतातील कार प्रवाशांच्या सुरक्षेचा विचार करून सीट बेल्ट अलार्म स्टॉपर्सवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो अशी माहिती आता समोर आली आहे. 

सरकार घेणार मोठा निर्णयसायरस मिस्त्री यांचा कार अपघातात मृत्यू झाल्यानंतर केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय चार महत्त्वाचे निर्णय घेऊ शकतं. 'हिंदुस्तान टाइम्स'च्या वृत्तानुसार, मंत्रालयानं एक अहवाल जारी केला आहे, ज्यामध्ये या चार मोठ्या निर्णयांचा उल्लेख करण्यात आला आहे. सीट बेल्ट अलार्म स्टॉपरवर बंदी घालण्यासोबतच परिवहन मंत्रालय कारमध्ये सहा एअरबॅग्ज आणि मधल्या व मागील सीटवर तीन-पॉइंट सीट बेल्ट अनिवार्य करण्याचा निर्णय घेऊ शकतं.

परिवहन मंत्रालय सीट बेल्टचं महत्त्व पटवून देण्यासाठी जनजागृती मोहीमही राबवू शकतं. रस्ते सुरक्षा आणि प्रवाशांच्या सुरक्षेसाठी केंद्र सरकार हे चार महत्त्वाचे निर्णय घेऊ शकतं. 

परिवहन मंत्रालय अॅक्शनमोडमध्येपरिवहन मंत्रालय नव्या रस्त्याच्या डिझाईनसाठी प्रस्तावाचे पुनरावलोकन करू शकतं. जर एखाद्यानं निश्चित केलेले निकष पूर्ण केले नाही तर त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल. मंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, ते या सर्व गोष्टींसाठी ऑर्डर तयार करत आहेत आणि प्रक्रिया सुरू आहे. अशाप्रकारे सर्व प्रकारच्या सीट बेल्ट क्लिपवर बंदी घालण्याचा आदेशही लवकरच जारी करण्यात येणार आहे.

टॅग्स :Cyrus Mistryसायरस मिस्त्रीAccidentअपघात