शहरं
Join us  
Trending Stories
1
'काँग्रेसचा खरा चेहरा समोर आला', मल्लिकार्जुन खर्गेंच्या 'त्या' वक्तव्यावर PM मोदींचा घणाघात
2
अंधेरी पूर्वेत पंधरा ते वीस दुकानांना भीषण आग;कामगार अडकल्याची भीती, अग्निशमनच्या गाड्या दाखल
3
जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा टार्गेट किलींग; 2 बिगर कश्मिरी मजुरांवर दहशतवाद्यांचा गोळीबार
4
पाकिस्तानचे अध्यक्ष आसिफ अली झरदारी यांच्या पायाला दुखापत, दुबईत विमानातून उतरताना अपघात झाला
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: काटेवाडीत पाडवा का साजरा करणार? अजित पवारांनी कारणच सांगितलं, म्हणाले...
6
कॅनडामध्ये सुपरलॅबचा भंडाफोड, मोठ्या प्रमाणात ड्रग्ज आणि शस्त्रे जप्त, भारतीय वंशाच्या व्यक्तीला अटक
7
३०० कंटेनरचे सामूदायिक लक्ष्मीपूजन; सांगवीच्या तरुणांकडे ४५० कंटेनरची मालकी
8
"बाळासाहेब असते तर थोबाड फोडलं असतं"; अरविंद सावंतांच्या वक्तव्यावर CM शिंदेंची प्रतिक्रिया
9
ऐन दिवाळीत मतदारांपर्यंत पोहचण्यासाठी दोन्ही पवारांची धावाधाव
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : सांगली विधानसभेत महाविकास आघाडीला धक्का! जयश्री पाटील निवडणूक लढवण्यावर ठाम
11
Maharashtra Election 2024: नाशिक पूर्वमध्ये थेट सामना; अन्य तीन मतदारसंघात तिरंगी, चौरंगी लढत
12
Muhurat Trading : मुहूर्त ट्रेडिंगनंतर तेजीसह बाजार बंद, 'या' १० शेअर्समध्ये जोरदार खरेदी, गुंतवणूकदारांनी कमावले ४ लाख कोटी
13
Mumbai Crime: फटाके फोडण्याच्या वादातून तरुणाची हत्या, मुंबईतील धक्कादायक घटना
14
जरांगेंच्या यादीला ओबीसींची यादी तयार, जो तो उठतोय त्यांनाच भेटायला जातोय; लक्ष्मण हाकेंनी रणशिंग फुंकले
15
किंग कोहलीची 'विराट' चूक; मैदानात थांबण्यापेक्षा चोरटी धाव घेण्याच्या नादात फसला (VIDEO)
16
पोस्टर'वार'! योगी आदित्यनाथ यांच्या 'बटेंगे तो कटेंगे'ला अखिलेश यादवांकडून पलटवार
17
भीषण! पाकिस्तानमध्ये मोठा बॉम्बस्फोट; ५ शाळकरी मुलं आणि एका पोलिसासह ७ जणांचा मृत्यू
18
'लॉरेन्स बिश्नोईने मला लवकर मारावे...', खासदार पप्पू यादव असं का म्हणाले?
19
IND vs NZ, 3rd Test Day 1 Stumps : फलंदाजांमुळे टीम इंडिया अडचणीत; ८६ धावांत गमावल्या ४ विकेट्स
20
"चुकीची चिठ्ठी काढणारा पोपट, आजपर्यंत...!"; शंभूराज देसाई यांचा संजय राऊतांना टोला

आता नव्या कारमध्ये ड्रायव्हरसोबतच फ्रंट पॅसेंजर सीटसाठीही एअरबॅग अनिवार्य, म्हणून घेण्यात आला निर्णय  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 01, 2021 8:26 PM

Auto News: रस्ते परिवहन आणि महामार्ग मंत्रालयाने आता आपल्या धोरणात बदल करताना कारमध्ये फ्रंट पॅसेंजरसाठीही एअरबॅग अनिवार्य केल्या आहेत.

नवी दिल्ली - आतापर्यंत भारतामध्ये कारनिर्मिती करताना केवळ ड्रायव्हरसिटवरच एअरबॅग अनिवार्य करण्यात आल्या होत्या. मात्र रस्ते परिवहन आणि महामार्ग मंत्रालयाने आता आपल्या धोरणात बदल करताना कारमध्ये फ्रंट पॅसेंजरसाठीही एअरबॅग अनिवार्य केल्या आहेत. हा नवा नियम लागू करण्यासाठी सरकारने यापूर्वी १ एप्रिल २०२१ची तारीख निर्धारित करण्यात आली होती. मात्र आता ही मुदत २१ डिसेंबर २०२१ पर्यंत वाढवण्यात आली आहे. म्हणजेच २०२३च्या सुरुवातीपासून सर्व कारनिर्मात्या कंपन्यांना त्यांच्या नव्या कारमध्ये आता फ्रंट पॅसेंजर सीटवरसुद्धा एअरबॅग द्याव्या लागतील.  (The decision was taken to make airbags mandatory for the front passenger seat as well as the driver in the new car.)सरकारकडून नवे नियम बनवण्यात आल्यानंतर सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाईल मॅन्युफ्रॅक्चर्सने हा नियम लागू करण्यासाठी ३१ डिसेंबरपर्यंतची मुदत मागितली आहे. सरकारला हा नियम लागू करण्याची आवश्यकता का भासली आणि त्याचे काय फायदे होतील, हे आपण जाणून घेऊयात.

कार चालवतेवेळी ड्रायव्हरचा हात स्टेअरिंगवर असतो. त्यामुळे ड्रायव्हरची पकड मजबूत राहते. तर अॅक्सिडेंट होताना पॅसेंजर सीटवर बसलेल्या व्यक्तीकडे केवळ सीटबेल्टचाच आधार असतो. अॅक्सिडेंट होताना एअरबॅगमुळे ड्रायव्हरचा बचाव होतो. मात्र शेजारी बसलेल्या व्यक्तीचे डोके विंडशिल्डवर आपटू शकते. त्यामुळे गंभीर जखम होऊ शकते. अशा परिस्थितीत पुढे बसलेल्या प्रवाशासाठीही एअरबॅग अॅक्सिडेंट झाल्यास जीवरक्षक ठरू शकते.

वेगाने अॅक्सिडेंट झाल्यास पॅसेंजर सीटवर बसलेल्या व्यक्तीचे डोके जर डॅशबोर्ड किंवा कुठल्याही इतर भागावर आपटले तर गंभीर जखमेमुळे मृत्यू होऊ शकतो. कारचा डॅशबोर्ड हा मजबूत प्लॅस्टिक किंवा वुडन मटेरियपासून बनलेला असतो, त्यामुळे गंभीर दुखापत होऊ शकते. अशा परिस्थितीत पुढे बसलेल्या दोन्ही व्यक्तींसाठी एअरबॅग असणे अनिवार्य ठरते.   

टॅग्स :Automobile Industryवाहन उद्योगcarकारroad transportरस्ते वाहतूक