मुंबई : भारत स्टेज ६ मानकांची पूर्तता न करणा-या वाहनांची १ एप्रिलपासून नोंदणी करू नये, असे आदेश परिवहनविभागाने सर्व प्रादेशिक आणि उपप्रादेशिक परिवहन विभागांना (आरटीओ) दिले आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार १ एप्रिल, २०२० पासून भारत स्टेज ६ (बीएस ६) मानकांची पूर्तता न करणाºया वाहनांची नोंदणी करू नये, तसेच याबाबतची माहिती वितरक आणि संबंधितांना द्यावी, असेही या आदेशात नमूद आहे. देशात वाहनांचे प्रमाणदिवसेंदिवस वाढत असल्याने प्रदूषित शहरांच्या संख्येत भर पडली आहे.हवेतील कार्बन मोनाक्साइड, नायट्रोजन आॅक्साइडचे प्रमाण वाढल्याने श्वसनाचे विकार वाढत आहेत. त्यामुळे आता केंद्र सरकारने प्रदूषण रोखण्यासाठी बीएस - ४ वाहनांची नोंदणी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. कारण या वाहनांमधून धूर जास्त प्रमाणात सोडला जात असून त्यामुळे प्रदूषण वाढते. ही समस्या लक्षात घेता बीएस - ४ ऐवजी १ एप्रिलपासून प्रदूषण रोखणाºया बीएस - ६ मानांकनाची पूर्तता करावी लागेल. त्याशिवाय वाहनांची नोंदणी न करण्याचे आदेश परिवहन विभागाने आरटीओकार्यालयांना दिले आहेत.इमिशन स्टॅण्डर्ड म्हणजे काय?भारतात २००० साली वाहनांसाठी इमिशन स्टॅण्डर्ड ठरविण्यात आले. आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या निकषांनुसार हवेचे प्रदूषण नियंत्रित करण्यासाठी हे नियम ठरविण्यात आले. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण महामंडळाने यासाठी काही स्टॅण्डर्डठरविले आहेत. बीएसचा संबंध इमिशन स्टॅण्डर्डशी आहे. बीएस म्हणजे भारत स्टेज. तुमची गाडी किती प्रदूषण करते, हे तपासले जाते. यामध्ये जो नंबर असतो, त्यावरून त्या वाहनामुळे किती प्रदूषण होण्याची शक्यता असते, याचा अंदाज येतो. त्यावरूनच बीएस ३, बीएस ४ आणि बीएस ६ हे स्टॅण्डर्ड ठरविले जातात.