शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्याला आवर घालायचे काम तुमच्याकडून..."; नितेश राणेंच्या भाषेवरून शरद पवार संतापले, भाजपाला सुनावले
2
"...मग तुमचा सत्तेत राहून उपयोग काय?", संभाजीराजे महायुती सरकारवर संतापले
3
"मी मराठी आणि मुस्लिमांशी व्यवहार करत नाही", मुंबईच्या लोकलमधील 'टीसी'चं संभाषण व्हायरल; वादाला फोडणी!
4
मुलांना नक्की दाखवा...! त्सूचिन्शान एटलास धूमकेतू येतोय पृथ्वीच्या जवळ; या तारखेपासून होणार दर्शन
5
शेजारी अरविंद केजरीवालांची खुर्ची, पदभार स्वीकारताच आतिशी म्हणाल्या, "मी भरताप्रमाणे…’’  
6
IND vs BAN : अन् हिटमॅन रोहितनं फुकला मंत्र; व्हिडिओ व्हायरल
7
मराठा आरक्षण उपसमितीची आज महत्त्वपूर्ण बैठक; हैदराबाद गॅझेटियरबाबत निर्णय होणार?
8
हिजबुल्लाहने युद्धाची घोषणा केली; 'हिसाब-किताब' नाव दिले, म्हणाले- उत्तर कसे द्यायचे ते..."
9
धनगर आरक्षणाचा जीआर निघाला तर ६५ आमदार राजीनामा देणार; महायुतीच्या आमदाराचा इशारा
10
४४ वर्षांनंतर काँग्रेसने जम्मू-काश्मीरच्या तरुणाला दिली जबाबदारी,उदय भानू चिब कोण आहेत?
11
आधी आक्रमक इशारा, नंतर हात जोडले; शरद पवारांच्या पक्षात गेलेल्या नेत्याबद्दल अजित पवार काय म्हणाले?
12
यंदाचा नवरात्रोत्सव १० दिवस: कधी सुरू होणार नवरात्री? पाहा, घटस्थापनेचा मुहूर्त अन् मान्यता
13
...तर अशांवर POCSO गुन्हा दाखल होणार; चाइल्ड पोर्नोग्राफीवर सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
14
जिथं फिल्डर चुकला; तिथं फलंदाजानंच विणलं आपल्या विकेटचं जाळं! क्रिकेटमधील अजब-गजब रन आउट (VIDEO)
15
Chanakyaniti: गूढ आणि आकर्षक व्यक्तिमत्त्व हवं? चाणक्यनीतीचे 'हे' पाच नियम अंमलात आणा
16
अनिल अंबानींचे अच्छे दिन परतले, सलग चौथ्या दिवशी Reliance Power ला अपर सर्किट; Infra मध्येही तेजी
17
मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि CM एकनाथ शिंदेंची भेट; 'वर्षा' बंगल्यावर अर्धा तास खलबतं
18
काँग्रेस नेत्या कुमारी शैलजा भाजपात जाणार? खट्टर यांच्या ऑफरवर दिलं स्पष्ट उत्तर...   
19
टायमिंगच्या नादात बसनं वेग पकडला; भीषण अपघातात ६ जण जागीच ठार
20
धमकी देणारा 'तो' आमदार कोण?; भरत गोगावलेंच्या गौप्यस्फोटावर संजय शिरसाट यांचा दावा

आता मद्यपान करून वाहन चालवता येणार नाही, ड्रायव्हिंग सीटवर बसताच वाजणार अलार्म!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2022 11:46 AM

Drink and Drive : बहुतेक देशांमध्ये मद्यपान करून वाहन चालवणे हे बेकायदेशीर आहे. या गुन्ह्यासाठी कठोर शिक्षाही होऊ शकते.

नवी दिल्ली :  मद्यपान करून वाहन चालवणे हे जगभरातील रस्ते अपघातांचे प्रमुख कारण आहे. यामुळे दरवर्षी हजारो लोकांना आपला जीव गमवावा लागतो. बहुतेक देशांमध्ये मद्यपान करून वाहन चालवणे हे बेकायदेशीर आहे. या गुन्ह्यासाठी कठोर शिक्षाही होऊ शकते. असे असूनही मद्यपान करून वाहन चालवण्याचे प्रमाण कमी होत नाही. 

पण जर तुमची कार स्वतःच तुम्हाला ड्रायव्हिंग करण्यापासून थांबवत असेल तर? ...होय. असे होऊ शकते. कारण, अमेरिकेत अशा एका टेक्नॉलॉजीवर काम सुरू आहे, ज्यामुळे मद्यपान करून वाहन चालवणाऱ्या ड्रायव्हरची माहिती मिळणार आहे. या टेक्नॉलॉजीला अल्कोहोल इम्पेयरमेंट डिटेक्शन सिस्टम, असे नाव देण्यात आले आहे. ही टेक्नॉलॉजी थेट वाहनांमध्ये इन्स्टॉल केली जाणार आहे.

अशाप्रकारे काम करू शकते टेक्नॉलॉजीमद्यपान व्यक्ती शोधण्याची टेक्नॉलॉजी अनेक प्रकारे कार्य करते. या टेक्नॉलॉजीद्वारे ड्रायव्हरच्या चेहऱ्यावर सतत नजर ठेवली जाते. ड्रायव्हरला अलर्ट ठेवण्यासाठी ड्रायव्हर डिटेक्शन सिस्टीम जशी काम करते, त्याच पद्धतीने ही टेक्नॉलॉजी काम करते. ड्रायव्हर दारूच्या नशेत गाडी चालवायला बसला तर लगेच अलार्म वाजू लागतो. मात्र, ही टेक्नॉलॉजी अद्याप पूर्णपणे विकसित झालेली नाही. यावर सातत्याने काम सुरू आहे.

अनेकांचे प्राण वाचवता येतीलअमेरिकेतील नॅशनल ट्रान्सपोर्टेशन सेफ्टी बोर्डने (NTSB)कार निर्मात्यांना असे सेफ्टी फीचर्स सर्व वाहनांमध्ये स्टँडर्डपणे देण्यास सांगितले आहे. अशा आधुनिक टेक्नॉलॉजीमुळे अनेक अपघात टाळता येतील आणि अनेकांचे प्राण वाचवता येतील, असा नॅशनल ट्रान्सपोर्टेशन सेफ्टी बोर्डचा विश्वास आहे.

भारतात दरवर्षी हजारो लोकांचा होतो मृत्यूअमेरिकेत 2020 मध्ये मद्यपान करून वाहन चालवल्यामुळे 11,000 हून अधिक मृत्यू झाले आहेत. भारताविषयी बोलायचे झाले तर, येथे मद्यपान करून गाडी चालवल्यामुळे दरवर्षी जवळपास 8,300 लोकांचा मृत्यू होतो. अनेकदा दारूच्या नशेत वाहनचालक स्वतःवरील नियंत्रण गमावून बसल्याचे दिसून येते. यादरम्यान त्याला कारवर नियंत्रण ठेवता येत नाही. वेग, चुकीच्या लेनमधून वाहन चालवणे आणि यादृच्छिकपणे उलटणे ही अपघातांची काही कारणे आहेत.

टॅग्स :Automobileवाहन