काही लोक हे त्यांच्या आवडी पूर्ण करण्यासाठी काहीही करतात. याबाबतीत दुबईचे शेख लोक दोन पावले पुढेच आहेत. गोल्ड आणि महागड्या गाड्यांची आवड असणाऱ्या शौकीन शेखांमध्ये हमद बिन हमदान अल नयन (Hamad bin Hamdan Al Nahyan) हा शेख असा आहे ज्याच्याकडे जगातली सर्वात मोठी SUV कार आहे. या शेखाने त्याच्या पसंतीनुसार ही एसयूव्ही एका मिलिट्री ट्रक आणि एक जीपला एकत्र करून तयार केली आहे. शेख हमदने स्वत: या एसयूव्हीचे शानदार फोटो आणि या गाडीची खासियत इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे.
२४ टनाच्या एसयूव्हीचं नाव 'ढाबियन'
या २४ टन एसयूव्हीचं नाव ढाबियन असं देण्यात आलं आहे. ज्यात १० मोठाले टायर आहेत. त्यासोबतच ४ टायर एसयूव्हीच्या आकर्षक लूकसाठी लावण्यात आले आहेत. काही दिवसांपूर्वीच या आलिशान कारचं प्रदर्शन शारजाहमध्ये अल मदम म्युझिअममध्ये करण्यात आलं होतं. मात्र या कारची किंमत जाहीर करण्यात आलेली नाही. पण ही पाहिल्यावर ही स्वस्त असेल असा विचार चुकूनही मनात येत नाही.
रिपोर्ट्सनुसार, ही एसयूव्ही जीप रॅंगलर-डॉज डार्ट आणि ओशकोश एम १०७५ मिलिट्री ट्रकच्या भागांना जोडून तयार करण्यात आलं आहे. ही १०.८ मीटर लांब, ३.२ मीटर उंच आणि २.५ मीटर रूंद आहे. एसयूव्हीमध्ये ६ सिलेंडर कॅटरपिलर C१५ डीझल इंजिन लावण्यात आलं आहेत. रॅंगलर जीपचा भाग या एसयूव्हीमध्ये ड्रायव्हर कॅबिनसाठी वापरण्यात आला आहे.
ही आलिशान एसयूव्ही तयार करणारे आणि डिझाइन करणारे स्वत: शेख हमद आहेत. ते यूएईमधील लोकप्रिय कार कलेक्टर आहेत. त्यांच्याकडे अनेक लक्झरी कार्स आहेत.