शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024:- घासून येणार की ठासून? धाकधूक अन् टेन्शन!; ‘काहीही होऊ शकते’ असे किमान १०० मतदारसंघ
2
पुन्हा २३ नोव्हेंबर! आताही असेच काही घडले तर?
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: पत्नी व संतती यांच्याकडून सुखद बातमी मिळेल!
4
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
5
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: विधानसभेच्या मतमोजणीला सुरुवात; काही मतदारसंघातील कल हाती!
6
यशोमती ठाकुरांचा विजयी चौकार की भाजपाला संधी; तिवसा मतदारसंघात कोण मारणार बाजी?
7
Maharashtra Election Results 2024: नाही जिंकलो तर मिशी काढणार,  समर्थकांनी लावल्या लाखोंच्या पैजा
8
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
9
विशेष लेख: ‘प्रोजेक्ट गॅदर’ : एकटेपणावर ‘अमेरिकन’ उपाय
10
"शेवटचे मत मोजेपर्यंत मोजणी केंद्र सोडू नका, निवडून आल्यावर थेट मुंबईला या"
11
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
12
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
13
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
14
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई
15
दक्षिणेतील अभिनेत्यांना मुंबईच्या रिअल इस्टेटची भुरळ; वर्षभरात १०० कोटी रूपयांहून अधिक गुंतवणूक
16
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
17
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
18
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
19
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
20
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण

Ducati Monster SP: एकदा पाहाल तर पाहातच राहाल; Ducati ने भारतात लॉन्च केली दमदार 'मॉन्सटर बाइक'

By ऑनलाइन लोकमत | Published: May 03, 2023 1:38 PM

इटालियन कंपनी Ducati ने आपली दमदार Monster SP भारतात आणली आहे.

Ducati Monster SP: इटलीतील आघाडीची दुचाकी कंपनी Ducati ने आपली प्रसिद्ध बाइक  Monster SPचे नवीन अपडेटेड मॉडेल भारतीय बाजारपेठेत लॉन्च केले आहे. आकर्षक लुक आणि दमदार इंजिन क्षमता असलेल्या या बाईकची सुरुवातीची किंमत 15.95 लाख रुपये ठेवण्यात आली आहे. कंपनीने या बाईकमध्ये काही नवे बदल केले आहेत, ज्यामुळे या बाईकची स्पर्धा सेगमेंटमधील ट्रायम्फ स्ट्रीटशी असेल.

Ducati Monster SP मध्ये नवीन काय?

अपडेटेड डुकाटी मॉन्स्टर एसपी बद्दल बोलायचे झाले तर, ही डिझाईनच्या बाबतीत स्टँडर्ड मॉडेलसारखीच आहे. यात मोटोजीपी प्रेरित ब्लॅक-आउट भाग आणि पॅसेंजर सीट काउल मिळेल. याशिवाय प्रोजेक्टर स्टाईल हेडलाइट्स, LED डे टाईम रनिंग लाईट, लहान फ्लाय स्क्रीन, इंटिग्रेटेड टर्न इंडिकेटरसह मस्क्यूलर फ्युएल टँकमुळे बाईकचा लूक आणखी चांगला होतो. कंपनीने यात स्टेप-अप सीट आणि ट्विन एक्झॉस्ट (सायलेन्सर) दिले आहेत. या व्यतिरिक्त यात 17-इंच अलॉय व्हील आहेत, ज्यामुळे गाडीची साइड प्रोफाइल आकर्षक बनते.

कंपनीचा दावा आहे की, ही बाईक हाय-स्पेसिफिकेशन हार्डवेअरसह येते. यात ओहलिन्सकडून घेतलेले 43 मिमी NIX अपसाइड-डाउन फ्रंट फॉर्क्स सस्पेंशन आणि मागील बाजूस मोनोशॉक सस्पेंशन आहे. हाय स्पीडमध्ये तात्काळ ब्रेकिंग लावण्यासाठी यात 320 मिमी फ्रंट डिस्क ब्रेक देण्यात आला आहे.

पॉवर आणि परफॉर्मेंस: 

Monster SP मध्ये कंपनीने 937cc क्षमतेचे ट्विन-सिलेंडर, लिक्विड-कूल्ड इंजिन वापरले आहे, जे 9,250rpm वर 111hp पॉवर आणि 6,500rpm वर 93Nm चा पीक टॉर्क जनरेट करते. हे इंजिन सहा-स्पीड गिअरबॉक्सशी जोडलेले आहे. या बाईकचे एकूण वजन 166 किलो आहे आणि कंपनी त्यात 14 लीटरची इंधन टाकी देत ​​आहे.

टॅग्स :bikeबाईकAutomobileवाहनIndiaभारत