मुंबई: गोदावरी इलेक्ट्रिक मोटर्स या इलेक्ट्रिक दुचाकी व तीन-चाकीच्या इब्लू श्रेणीच्या उत्पादक कंपनीने भारतातील पहिली ई-स्कूटर इब्लू फिओच्या लाँच केली आहे. इब्लू फिओच्या प्री-बुकिंग्जना १५ ऑगस्ट पासून सुरुवात झाली असून डिलिव्हरी देखील सुरु झाली आहे.
या स्कूटरची किंमत ९९,९९९ रूपये ठेवण्यात आली आहे. यामध्ये २.५२ किलो वॅट लीआयन बॅटरी देण्यात आली आहे. इकॉनॉमी, नॉर्मल व पॉवर असे तीन मोड देण्यात आले आहेत. ही स्कूटर ११० किमीची रेंज देण्यास सक्षम असल्याचा दावा कंपनीने केला आहे.
या स्कूटरचा वेग ६० किमी/तास एवढा आहे. रिजनरेटिव्ह ब्रेकिंगही देण्यात आली आहे. सियान ब्ल्यू, वाइन रेड, जेट ब्लॅक, टेलि ग्रे, ट्रॅफिक व्हाइट अशा पाच रंगांमध्ये ती उपलब्ध आहे. फ्रण्ट व रिअरमध्ये सीबीएस डिस्क ब्रेकिंग देण्यात आले आहे. एएचओ एलईडी हेडलॅम्प्स आणि एलईडी टेल लॅम्प्स देण्यात आले आहेत.
नेव्हिगेशनसाठी ब्ल्यूटूथ कनेक्टीव्हीटी देण्यात आली आहे. गॅस सिलिंडर मावेल एवढा मोठा फ्लोअरबोर्ड देण्यात आला आहे. ७.४ इंच डिजिटल फुल कलर डिस्प्ले देण्यात आला असून सर्विस अलर्ट, साइड स्टॅण्ड सेन्सर, ब्ल्यूटूथ कनेक्टीव्हीटी, नेव्हिगेशन असिस्टण्ट, इनकमिंग मॅसेज अलर्ट, कॉल अलर्ट, मोड्स डिस्प्ले, रिव्हर्स इंडिकेटर, बॅटरी एसओसी इंडिकेटर, थ्रॉटल फॉल्ट सेन्सर, मोटर फॉल्ट सेन्सर, बॅटरी अलर्ट आणि हेल्मेट इंडिकेटरचा आदी सुविधा आहेत.
ही स्कूटर घरी चार्ज करण्यासाठी ५ तास २५ मिनिटे लागतात. कंपनी ३ वर्ष आणि ३०,००० किमी वॉरंटी देत आहे.