नवी दिल्ली - भारतात इलेक्ट्रिक टू-व्हीलर्सची बाजारपेठ झपाट्याने वाढत आहे आणि रोजच्या रोज नवीन स्टार्टअप्स त्यांची इलेक्ट्रिक वाहने सादर करत आहेत. यातच एक आहे ओबेन. ओबेन येणाऱ्या काही आठवड्यांतच इलेक्ट्रिक दुचाक्यांच्या सेगमेंट मध्ये एन्ट्री करेल. ही मोटरसायकल स्पोर्टी आहे आणि तिला काही रेट्रो टचदेखील देण्यात आले आहेत. या ई-बाईकला लाल आणि काळा असा ड्युअल टोन कलर देण्यात आला आहे. लॉन्चच्या वेळी कंपनी या दुचाकी आणखी काही रंगांत लॉन्च करू शकते.
एका फुल चार्जमध्ये 200 किमीपरंयत रेंज -ओबेन इलेक्ट्रिक बाइक आरामदायक असून ती प्रिमियम रायडिंग स्टांससह लॉन्च होन्याचा अंदाज आहे. ही बाइक दिसायला छोट्या आकाराची आहे. तसेच चांगल्या कंट्रोलिंगच्या दृष्टीने तिचे सीट बनवण्यात आले आहे. या बाइकचा ग्राउंड क्लियरन्सदेखील फारच सुंदर आहे. यामुळे शरांतील रस्त्यांबरबोबरच ती ऑफ-रोडही चालविली जाऊ शकते. सर्वसाधारण दुचाकींच्या तुलनेत हिचा ग्राउंड क्लियरन्स फारच छान आहे. एकदा चार्ज केल्यानंतर ही ई-बाइक 200 किमीपर्यंत चालविली जाऊ शकते. हिची रेंज रिव्होल्ट आणि ओला टू-व्हीलर्सपेक्षा अधिक आहे.
2 तासांच चार्ज होते बॅटरी - या इलेक्ट्रिक बाइकची टॉप स्पीड 100 किमी/तास एवढी आहे. तर 3 सेकंदांत ही 0-40 किमी/तास एवढा वेग घेते. बाइकसाठी वापरण्यात आलेली बॅटरी 2 तासांत फुल चार्ज केली जाऊ शकते. गाडीचा बॅटरी पॅक मॅक्झिमम हिट एक्सचेन्ज टेक्नॉलीजीसह आलेले आहे. यामुळे बॅटरी थंड राहते आणि दुचाकीचा वेग कायम राहतो. इलेक्ट्रिक बाइकला आयओटी सारखे कनेक्टिव्हिटी फीचर सर्वसामान्यपणे मिळू शकतात. युजर्स हिच्या रेंजचा डेटा पाहू शकतात आणि आपल्या राइड्सचे एनालिसिस करू शकतात.