भारतासह अनेक देशांमध्ये यामहा (Yamaha) कंपनीची एक प्रसिद्ध बाईक होती. या बाईकचे नाव Yamaha RX100 होते. तिचा पिकअप, गिअर टाकल्यावरचे मागचे चाक फिरणे आणि सायलेन्सरचा आवाज आदी भारीच होता. साधारण आता 35-40 शीमध्ये असलेल्या तेव्हाच्या कॉलेज तरुणांमध्ये तर प्रचंड क्रेझ होती. आजही बऱ्याच जणांनी ही बाईक जपून ठेवली आहे. या लोकांना यामहा ही बाईक नव्या अवतारात कधी ना कधी लाँच करेल अशी आशा आहे. त्य़ा लोकांसाठी एक आनंदाची बातमी आहे.
यामहाने नाही तर स्वीडनच्या एका कंपनीने या लूकमधील इलेक्ट्रीक बाईक लाँच केली आहे. RGNT असे या कंपनीचे नाव असून RGNT No.1 Classic असे या बाईकचे नाव आहे. ही बाईक लोकांना य़ामहा आरएक्स 100 ची आठवण जरूर करून देईल. तुम्ही विचार कराल की RGNT No.1 Classic कुठे आणि काही वर्षांआधी बंद झालेली आरएक्स 100 कुठे. परंतू हे फोटो पाहिल्यावर तुम्हाला RX100 आठवेलच.
एका धक्का देणारी बाब म्हणजे, ही इलेक्ट्रीक बाईक प्रचंड महागडी आहे. किंमत पाहून म्हणाल या किंमतीत आता एकसोएक कार येतील. युरोपीय देशांमध्ये RGNT No.1 Classic ची किंमत 10.8 लाख रुपये ठेवण्यात आली आहे. महत्वाचे म्हणजे ही बाईक पूर्णपणे हाताने बनविण्यात आली आहे. याच्या उत्पादनात मशीनचा वापर करण्यात आलेला नाही. यामुळे ही एवढी महाग आहे. कर्मचाऱ्यांनी एकेक पार्ट हा त्यांच्या हाताने असेंबल केला आहे.
ही बाईक अमेरिका आणि युरोपच्या बाजारात उपलब्ध होणार आहे. RGNT No.1 Classic चा लूक हा रेट्रो आहे. राऊंड हेडलँप, टिअर ड्रॉप आकाराचा फ्युअल टँक, सिंगल पीस सीट आणि क्लासी स्पोक व्हील्स लावण्यात आले आहेत. यामध्ये 7 इंचाची टचस्क्रीन डिजिटल इंन्स्ट्रूमेंट क्लस्टर, नेव्हिगेशन आणि एलईडी इल्युमिनेशनसोबत बाईक कंट्रोल युनिट देण्यात आले आहे. पुढे टेलिस्कोपिक फॉर्क्स आणि सीबीएस सिस्टिम देण्यात आली आहे.