शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐन दिवाळीत नेते बंडोबांना थंडोबा करण्याच्या मोहिमेवर; महायुती, महाआघाडीसाठी पुढील ४ दिवस वाटाघाटीचे
2
आजचे राशीभविष्य : शुक्रवार 1 नोव्हेंबर 2024; आज अवैध कामांपासून दूर राहावे, क्रोध आणि वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
दिवाळी झटका! LPG सिलिंडरचा भाव वाढला, पटापट चेक करा दिल्ली ते मुंबईपर्यंतचे नवे दर
4
२४ तासांत १०० विमानांना बॉम्बची धमकी, एअर इंडियाच्या ३६, विस्ताराच्या ३५ फेऱ्यांवर परिणाम  
5
नेपाळी नोटेवरील नकाशात दाखवली तीन भारतीय क्षेत्रे, नोटा छापण्याचे कंत्राट दिले चिनी कंपनीला
6
मनोज जरांगेंचे ‘एमएमडी’ समीकरण; विधानसभा लढवण्याची घोषणा
7
मुंबईकरांना भुरळ लाइटवेट दागिन्यांची! धनत्रयोदशीला बाजारात २५० कोटींची उलाढाल
8
निवडणुकीतील गैरप्रकार थांबवा, अन्यथा कारवाई, मुख्य निवडणूक अधिकारी चोक्कलिंगम यांचा इशारा
9
राज्यातील बेरोजगारीवर न बोलणारे हे कसले सरकार? काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा सवाल
10
पाकिस्तानसह जगभर दिवाळीची धूम, अमेरिकेत शाळांना सुट्टी
11
राज्यात आलेली सर्वाधिक परकीय गुंतवणूक फडणवीसांच्या नावावर
12
आयपीएल रिटेंशन : रोहित शर्मा मुंबईकडेच; माही केवळ ४ कोटींमध्ये खेळणार
13
समतोल ‘मन’ हेही ‘धन’; आज त्याची पूजा करू या!
14
मध्य रेल्वेने प्रवाशांना धरले वेठीस; ४ दिवस सुटीचे वेळापत्रक लागू
15
19 मिनिटांत 22 किलोमीटरचे अंतर पार अन् मिळाले जीवदान
16
खंडणीसाठी धमकावल्याप्रकरणी छोटा राजन टोळीचे ५ जण अटकेत
17
इस्रायली महिला फायटर्सचे इराणवर हल्ले!
18
११ वर्षीय पीडितेच्या गर्भपातास परवानगी; रक्त नमुना, टिश्यू जतन करण्याचे निर्देश 
19
‘राज’ की बात, भाजप अन् शिंदेंची अडचण!
20
दिवाळी, छटपूजेनिमित्त मध्य रेल्वेच्या ५८३ गाड्या

Electric Car : ही असेल देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक SUV, टाटा नेक्सॉन EV ची करेल सुट्टी?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 08, 2023 4:58 PM

खरे तर, कंपनीचा फोकस आपल्या ईव्ही वाहनांचा आणखी विस्तार करण्यावर आहे. लवकरच कंपनीची सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार येत आहे.

भारतीय इलेक्ट्रिक कार बाजारात टाटा मोटर्सने (Tata Motors) स्वतःला प्रस्थापित केले आहे. सध्या ही देशातील पहिल्या क्रमांकाची इलेक्ट्रिक कार विकणारी कंपनी आहे. हा टप्पा गाठण्यात कंपनीची सर्वात जास्त विक्री होणारी इलेक्ट्रिक एसयूव्ही Tata Nexon EV च्या यशाचा मोठा वाटा आहे. टाटा आपली Tiago आणि Tigor चीही इलेक्ट्रिक व्हर्जनमध्ये विक्री करते. खरे तर, कंपनीचा फोकस आपल्या ईव्ही वाहनांचा आणखी विस्तार करण्यावर आहे. लवकरच कंपनीची सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार येत आहे.

टाटा मोटर्सने (Tata Motors) 2023 च्या ऑटो एक्सपोमध्ये  आपल्या Harrier SUV चे EV व्हर्जन सादर केले होते. हे व्हर्जन लवकरच भारतीय बाजारात आणले जाऊ शकते. हॅरिअर ईव्ही Tata च्या पोर्टफोलिओमध्ये नेक्सॉन ईव्हीच्या वर ठेवली जाईल. तसेच, टाटा मोटर्स कथितपणे आणखी एक इलेक्ट्रिक SUV लॉन्च करन्यासंदर्भात विचार करत आहे, जी Nexon च्या खोलोखाल प्लेस केली जाऊ शकेल. माध्यमांतील वृत्तांनुसार, टाटा पंच मायक्रो SUV चे इलेक्ट्रिक व्हर्जन बाजारात आणले जाऊ शकते.

माध्यमांतील वृत्तांनुसार, टाटा मोटर्सची पंच मायक्रो एसयूव्ही 2023 च्या अखेरपर्यंत लॉन्च लॉन्च  करण्याचा प्लॅन आहे. ही कार Gen 2 (सिग्मा) प्लॅटफॉर्मवर आधारित असेल. जे टाटा अल्ट्रोजमध्ये वापरले गेलेले ALFA आर्किटेक्चरचे एक संशोधित व्हर्जन आहे. पंच EV दोन बॅटरी पॅक ऑप्शनसह बाजारात आणली जाण्याची शक्यता आहे. एक बॅटरी पॅक Tiago EV प्रमाणे 26kWh आणि दुसरा Nexon EV प्रमाणे 30.2kWh बॅटरी पॅक असू शकतो.

मात्र, पंच ईव्हीसंदर्भात टाटा मोटर्सकडून कुठल्याही प्रकारची आधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. पण ही कार लॉन्च केल्यास, भारतातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक एसयूव्ही ठरण्याची शक्यता आहे. जिची किंमत अंदाजे 10 ते 14 लाख रुपयांपर्यंत असू शकते.

टॅग्स :TataटाटाAutomobileवाहनcarकारElectric Carइलेक्ट्रिक कारelectric vehicleइलेक्ट्रिक कार / स्कूटर