इलेक्ट्रीक कार महागड्या असल्या तरी त्यांना चार्ज करणे खूप स्वस्त आहे. तसेच त्यातून फिरणेदेखील स्वस्त आहे. परंतू देशाची राजधानी असलेल्या दिल्लीत हे आणखी स्वस्त होणार आहे. म्हणजेच ३००ते ४८० किमीची रेंज असलेल्या कार फक्त दोन रुपये प्रति युनिटमध्ये चार्ज होणार आहेत. दिल्ली सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.
देशातील सर्वात मोठे ईव्ही चार्जिंग स्टेशन लवकरच राजधानी दिल्लीत सुरू होणार आहेस्टेशन देशातील सर्वात मोठेच नव्हे तर सर्वात स्वस्त देखील असेल. ऊर्जामंत्री सत्येंद्र जैन यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. दिल्ली सरकारने 500 EV चार्जिंग पॉइंट आणि 100 EV चार्जिंग स्टेशनसाठी निविदा काढल्या आहेत. ही सर्व स्थानके येत्या ३ महिन्यांत तयार होतील.
प्रदुषणाच्या मोठ्य़ा समस्येमुळे दिल्ली सरकार इलेक्ट्रिक वाहनांच्या वापराला सातत्याने प्रोत्साहन देत आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखाली दिल्ली सरकार या दिशेने सातत्याने काम करत आहे. ही 100 चार्जिंग स्टेशन आणि 500 चार्जिंग पॉइंट्स या वर्षी 27 जूनपर्यंत तयार होतील. यानंतर इलेक्ट्रिक कार खरेदीमध्ये लोकांची ओढ वाढेल, असे मानले जात आहे.
येथे EV साठी 2 रुपये प्रति युनिट दराने शुल्क आकारले जाईल. इतर राज्यांमध्ये हा दर 10 ते 15 रुपये इतका आहे. हे देशातील सर्वात स्वस्त ईव्ही चार्जिंग स्टेशन असेल. सरकारने 7 ऑगस्ट 2020 रोजी आपल्या EV धोरणात म्हटले होते की 2025 पर्यंत शहरातील 25 टक्के वाहने ईव्ही बनवण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे. ईव्हीवर कोणतेही नोंदणी शुल्क किंवा रोड टॅक्स न घेणारे दिल्ली हे भारतातील पहिले राज्य आहे.