नवी दिल्ली : भारतात इलेक्ट्रिक कारचा सेगमेंट झपाट्याने वाढत आहे. नवीन कार खरेदी करणाऱ्यांना बॅटरीवर चालणारी वाहने खूप पसंतीला येत आहेत. या सेगमेंटमध्ये टाटा मोटर्सचे वर्चस्व आहे. इलेक्ट्रिक SUV बद्दल बोलायचे झाले तर Tata Nexon EV सर्वात जास्त विकली जाते. मात्र, आता टाटा मोटर्सला टक्कर देण्यासाठी महिंद्रानेही तयारी केली आहे.
SUV स्पेशलिस्ट कंपनी लोकप्रिय XUV300 चे इलेक्ट्रिक व्हर्जन लाँच करण्याचा विचार करत आहे. Mahindra XUV300 चे फेसलिफ्ट व्हर्जन देखील पुढील वर्षी लाँच केले जाणार आहे. रिपोर्ट्सनुसार, कंपनी कारचे इलेक्ट्रिक व्हेरिएंट लाँच करण्याच्या तयारीत आहे. XUV300 EV चे डिझाइन आगामी XUV300 Facelift सारखे असू शकते. इलेक्ट्रिक कारच्या दृष्टिकोनातून महिंद्रा त्यात किरकोळ बदल करू शकते. आगामी काळात XUV300 EV ची थेट टक्कर Tata Nexon EV ला असू शकते.
सध्या Mahindra XUV400 EV टाटाच्या लोकप्रिय इलेक्ट्रिक SUV Nexon EV ला टक्कर देत आहे. मात्र, ही कार बाजारात फारच कमी विकली जाते. नवीन XUV300 EV सह, महिंद्राला आशा आहे की, कंपनी इलेक्ट्रिक SUV सेगमेंटमध्ये चांगली विक्री करेल. सध्या या सेगमेंटमध्ये Nexon EV ने ताबा घेतला आहे.
महिंद्रा XUV300 EV कार 35kWh बॅटरी पॅकच्या पॉवरसह बाजारात लाँच केले जाऊ शकते. ही XUV400 EV च्या 40kWh बॅटरी पॅकपेक्षा कमी पॉवरफुल आहे. मात्र, कंपनीने इलेक्ट्रिक मोटर किंवा रेंजबाबत अधिकृत माहिती दिलेली नाही. ही कार XUV400 EV पेक्षा कमी किमतीत लाँच केली जाऊ शकते.
महिंद्राच्या नवीन इलेक्ट्रिक SUV साठी Nexon EV ला टक्कर देणे सोपे असणार नाही. Nexon चे टॉप इलेक्ट्रिक मॉडेल 12.3 इंच इंफोटेनमेंट स्क्रीनसह येते. XUV300 EV ची अपेक्षित एक्स-शोरूम किंमत 15 लाख ते 17 लाख रुपये असू शकते. महिंद्राची नवीन इलेक्ट्रिक एसयूव्ही पुढील वर्षी लाँच होण्याची शक्यता आहे.