ओला आणि सिंपल एनर्जी या दोन भारतीय कंपन्यांनी स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून इलेक्ट्रीक स्कूटर लाँच केल्या होत्या. आता प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून स्वदेशी इलेक्ट्रिक वाहन निर्माता कंपनी Tork Motors ने भारतीय बाजारात इलेक्ट्रीक मोटरसायकल Kratos लाँच केली आहे. टॉर्क मोटर्सने या बाईकचे दोन व्हेरिअंट लाँच केले आहेत.
Tork Motors ने Kratos आणि Kratos R हे दोन व्हेरिअंट लाँच केले आहेत. या बाईकची सुरुवातीची किंमत १.०२ लाख आहे. ही किंमत दिल्ली एक्सशोरुम आहे, यामध्ये सबसिडीदेखील जोडलेली आहे. Tork Motors ने २६ जानेवारीपासूनच या बाईकची बुकिंग सुरु केली आहे. पुण्यात या बाईकची किंमत १.०७ लाखांपासून सुरु होते. (Tork Kratos Price in Pune, Maharashtra)
या दोन्ही बाईकची डिलिव्हरी एप्रिलपर्यंत करण्यात आली आहे. याबाईक कंपनीच्या वेबसाईटवर केवळ ९९९ रुपये देऊन बुक करता येणार आहेत. नवीन टॉर्क क्रेटॉस ईव्हीला टप्प्याटप्प्याने भारतभर उपलब्ध केले जाणार आहे. सुरुवातीला ही बाईक पुणे, मुंबई, हैदराबाद, चेन्नई, दिल्लीसारख्या महत्वाच्या शहरांमध्ये लाँच केले जाईल. दुसऱ्या टप्प्यात ही बाईक अन्य शहरांमध्ये उपलब्ध केली जाईल.
बॅटरी आणि रेंज...मोटरसायकलमध्ये 48V ची IP67-रेटेड 4 Kwh लिथियम-आयन बॅटरी देण्यात आली आहे. याची रेंज १८० किमी आहे. तर रिअल वर्ल्ड रेंज ही १२० किमी आहे. ही मोटरसायकल १०० किमी प्रति तास एवढ्या वेगाने धावू शकते. यामध्ये एक्सियल फ्लक्स टाइप इलेक्ट्रिक मोटर देण्यात आली आहे. चार सेकंदांत ही मोटरसायकल 0-40 किमी प्रति तासाचा वेग पकडते. Kratos R मध्ये अधिक क्षमतेची मोटर आहे. याचा टॉप स्पीड 105 kmph आहे. फास्ट चार्जिंग सुविधा केवळ Kratos R मध्ये देण्यात आली आहे. तसेच जियोफेंसिंग, फाइंड माई व्हीकल फीचर, मोटरवॉक असिस्ट, क्रॅश अलर्ट, व्हेकेशन मोड, ट्रॅक मोड आदी देण्यात आले आहेत.