Electric Scooter In India: भारतातील सर्वात मोठ्या इलेक्ट्रीक दुचाकी उत्पादकांपैकी एक असलेल्या Hero Electric ने त्यांच्या Optima HX सिटी-स्पीड इलेक्ट्रीक स्कूटरचं अपडेटेड व्हर्जन लॉन्च केलं आहे. नवीन Hero Electric Optima HX स्कूटर दोन व्हेरिअंटमध्ये सादर करण्यात आली आहे आणि त्याचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे आता यात क्रूझ कंट्रोल देखील देण्यात आलं आहे.
नवीन Hero Electric Optima HX स्कूटरला एक अपडेटेड इन्स्ट्रुमेंट क्लस्टरसह क्रूझ कंट्रोल देण्यात आलंय. याद्वारे ते फीचर सुरू आहे किंवा नाही हे दिसून येतं. जर तुम्हाला क्रूझ कंट्रोल अॅक्टिव्ह करायचे असेल, तर तुम्हाला केवळ फक्त एक बटण प्रेस करावं लागेल आणि एकदा अॅक्टिव्हेट झाल्यावर ते इन्स्ट्रुमेंट क्लस्टरवर दिसेल. क्रूझ कंट्रोल काढून टाकण्यासाठी, रायडरला फक्त थ्रॉटल फिरवणे किंवा ब्रेक लावणे आवश्यक आहे.
किंमत आणि फीचर्सHero Electric Optima HX मध्ये 1.2 kW ची इलेक्ट्रीक मोटर देण्यात आली आहे. या स्कूटरचा टॉप स्पीड 42 kmph आहे आणि सिंगल चार्जवर ही स्कूटर 82 किमी पर्यंत जाऊ शकतो. ही स्कूटर दोन व्हेरिअंटमध्ये उपलब्ध आहे. सबसिडीनंतर याच्या सिंगल बॅटरी व्हर्जनची किंमत 55,580 रुपये आणि डबल बॅटरी व्हर्जनची किंमत 65,640 रुपये एक्स शोरुम इतकी आहे. या इलेक्ट्रीक स्कूटरचे एकूण वजन 72.5 किलो असून सध्या ती रेड, ग्रे, ब्ल्यू आणि व्हाईट या रंगांमध्ये उपलब्ध आहे.