Bounce Infinity E1 Price & Features: Bounce ने इलेक्ट्रीक स्कूटर मार्केटमध्ये एन्ट्री घेत Infinity E1 ही इलेक्ट्रीक स्कूटर लाँच केली आहे. ही स्कूटर खरेदी करण्यासाठी ग्राहकांना दोन पर्याय मिळणार आहेत. पहिला म्हणजे विना बॅटरी, तसंच विना चार्जर आणि दुसरा म्हणजे बॅटरी आणि चार्चरसह. या दोन्ही पर्यायांमध्ये स्कूटरची किंमत निराळी असणार आहे. आता ग्राहकांना केवळ ४९९ रूपये देऊन ही स्कूटर बुक करता येईल.या स्कूटरमध्ये अनोखं ‘Battery As A Service’ हा पर्यायही देण्यात आला आहे. ही स्कूटर ग्राहकांना विना बॅटरीदेखील खरेदी करता येईल. यानंतर ग्राहक बोनसच्या बॅटरी स्वॅपिंग नेटवर्कच्या मदतीनं शुल्क देऊन डिस्चार्ज बॅटरीच्या जाही फुल बॅटरी चार्ज बॅटरी स्कूटरमध्ये लावू शकता. या पर्यायामुळे बॅटरी असलेल्या स्कूटरच्या तुलनेत ४० टक्के कमी किंमतीत विना बॅटरीची स्कूटर खरेदी केली जाऊ शकते.किती असेल किंमत?बॅटरी आणि चार्जरसह येणाऱ्या Bounce Infinity E1 ची दिल्लीतील एक्स शोरुम किंमत ६८,९९९ रुपये निश्चित करण्यात आली आहे. तर गुजरातमध्ये ५९,९९९ रुपये, महाराष्ट्रात ६९,९९९ रुपये, राजस्थानमध्ये ७२,९९९ रुपये आणि कर्नाटकात ६८,९९९ रुपये, तसंच अन्य राज्यांमध्ये या स्कूटरची किंमत ७९,९९९ रुपये ठेवण्यात आली आहे. दरम्यान विना बॅटरीसह स्कूटरची किंमत किती असेल याची माहिती अद्याप देण्यात आलेली नाही. परंतु काही रिपोर्ट्सनुसार याची किंमत ४५ हजारांच्या जवळपास असू शकते. याच दरम्यान कंपनीनं २०२१ या वर्षात 22Motors चं १०० टक्के अधिग्रहण जवळपास ५२ कोटी रूपयांमध्ये केल्याची माहिती दिली. या डीलनुसार इलेक्ट्रीक वाहन उत्पादक कंरनीनं २२ मोटर्सच्या राजस्थान येथील भिवाडी प्रकल्प आणि तेथील संपत्तीचे मालकी हक्क मिळवले आहेत. या प्रकल्पात वर्षाला १ लाख ८० स्कूटर्सचं उत्पादन केलं जाऊ शकतं. याशिवाय कंपनीनं दक्षिण भारतातही नवीन प्रकल्प सुरू करण्याच्या धोरणाची घोषणा केली आहे.
स्पेसिफिकेशन्सBounce Infinity E1 मध्ये 2kwh 8V बॅटरी पॅक देण्यात आलाय. यात ड्रॅग, इको आणि पॉवर असे तीन ड्रायव्हिंग मोड्सही देण्यात आले. पॉवर मोडमध्ये या स्कूटरचा कमाल वेग ६५ किमी असेल. इको मोडमध्ये ही स्कूटर ८५ किमीची ड्रायव्हिंग रेंज देते. ही स्कूटर डार्क ग्रे, ऑफ-व्हाईट, रेड, व्हाईट आणि ब्लॅक या रंगांमध्ये उपलब्ध असेल.