सध्या भारतीय बाजारपेठेत इलेक्ट्रिक स्कूटरची खूप चर्चा सुरू आहे. इलेक्ट्रिक टू-व्हीलर उद्योग इलेक्ट्रिक फोर-व्हीलरपेक्षा वेगाने वाढत आहे. चार्जिंगची पायाभूत सुविधा वेळेनुसार चांगली होत आहे आणि बॅटरी टेक्नॉलॉजी देखील प्रगत होत आहे. त्यामुळे इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करण्यासाठी ही सर्वोत्तम वेळ मानली जाऊ शकते.
पेट्रोलवर चालणाऱ्या स्कूटरऐवजी बॅटरीवर चालणाऱ्या स्कूटरमुळे तुम्हाला अनेक फायदे मिळू शकतात. इलेक्ट्रिक स्कूटरशी संबंधित काही गोष्टी जाणून घेणे महत्त्वाचे आहे. सर्वात आधी हे समजून घेतले पाहिजे की, पेट्रोल स्कूटरच्या तुलनेत इलेक्ट्रिक स्कूटरचा प्रचार का केला जात आहे. याशिवाय इलेक्ट्रिक स्कूटर घेण्यापूर्वी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात.
पेट्रोल स्कूटरच्या तुलनेत इलेक्ट्रिक स्कूटरची देखभाल सहज करता येते. दरम्यान, बॅटरीवर चालणाऱ्या स्कूटरमध्ये फार कमी पार्ट्स असतात. त्यामुळे त्यांची दुरुस्ती आणि देखभाल करण्यात फारसा त्रास होत नाही. नियमित सर्व्हिससाठीही तुम्हाला जास्त पैसे खर्च करावे लागत नाहीत. तसेच, कमी पार्टस् असल्यामुळे स्कूटर खराब होण्याची शक्यता कमी असते.
बॅटरीइलेक्ट्रिक स्कूटरमध्ये फिक्स्ड आणि रिम्यूव्हेबल अशा दोन प्रकारच्या बॅटरी येतात. ओला आणि एथर सारख्या कंपन्या फिक्स्ड बॅटरी ऑफर करतात, तर हिरोच्या इलेक्ट्रिक स्कूटर रिम्यूव्हेबल बॅटरी देतात. जर तुम्ही दररोज 20-30 किमी प्रवास करत असाल तर फिक्स्ड बॅटरी काम करेल. यापेक्षा जास्त गरज असल्यास रिम्यूव्हेबल बॅटरीसह स्कूटर निवडणे योग्य ठरेल.
फास्ट चार्जिंगनियमित चार्जरसह इलेक्ट्रिक स्कूटर फुल चार्ज करण्यासाठी साधारणपणे 5-6 तास लागतात. दरम्यान, फास्ट चार्जरद्वारे तुमचा बराच वेळ वाचेल, कारण त्यामुळे इलेक्ट्रिक स्कूटर फास्ट चार्ज होते.
1.50 लाख रुपयांपर्यंतची सबसिडीसरकार इलेक्ट्रिक स्कूटरलाही प्रोत्साहन देत आहे. नवीन इलेक्ट्रिक स्कूटर खरेदीवर तुम्हाला अनेक सवलती मिळतात. यामध्ये 1.50 लाख रुपयांपर्यंतच्या सबसिडीचा समावेश आहे. यामुळे इलेक्ट्रिक स्कूटर खरेदीचा खर्च बराच कमी होईल.
सॉफ्टवेअरपेट्रोल स्कूटरमध्ये बेसिक इन्स्ट्रुमेंट क्लस्टर पाहायला मिळतो. दुसरीकडे, इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये टचस्क्रीन, बेस्ट कन्सोल आणि अॅडव्हान्स सॉफ्टवेअरसह येतात. बॅटरी मॅनेजमेंट सिस्टीम (BMS) किंवा इलेक्ट्रॉनिक कंट्रोल युनिट (ECU) सारख्या सिस्टमसाठी मजबूत सॉफ्टवेअरची आवश्यकता असते.