शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
2
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
3
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
4
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
5
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
6
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
7
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
8
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
9
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
10
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
11
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
12
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
13
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
14
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
15
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
16
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
17
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
18
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
19
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
20
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!

'या' आहेत ५० हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीच्या १० बेस्ट Electric Scooters; फीचर्सही उत्तम

By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2021 4:57 PM

भारतात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढल्याने अनेक जण अन्य पर्यायांचा विचार करू लागले आहे.

Best Mileage Electric Scooter Under 50K In India: भारतात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढल्याने अनेक जण अन्य पर्यायांचा विचार करू लागले आहे. अशा परिस्थित गेल्या काही दिवसांपासून लोकांचा कल हा इलेक्ट्रीक वाहनांच्या खरेदीकडे लागला आहे. गेल्या ३-४ वर्षांत इलेक्ट्रीक स्कूटर्सच्या विक्रीत प्रचंड वाढ झाली आहे. दरम्यान, आता कमी किमतीतही चांगली बॅटरी रेंज असलेल्या नवीन इलेक्ट्रीक स्कूटर्स मिळत आहेत. जर तुम्ही इलेक्ट्रीक स्कूटर घेण्याचा विचार करत असाल तर आज आम्ही तुम्हाला 50 हजार रुपयांच्या आत 10 चांगल्या इलेक्ट्रीक स्कूटर्स आणि मायलेज बद्दल सांगणार आहोत.

कोमाकी आणि हीरो इलेक्ट्रिक स्कूटरभारतातील 50 हजार रुपयांपेक्षा कमी किमतीच्या सर्वोत्कृष्ट इलेक्ट्रीक स्कूटरबद्दल सांगायचे झाल्यास, Komaki Xone ​​इलेक्ट्रीक स्कूटर तुमच्यासाठी एक चांगला पर्याय आहे. या स्कूटरची किंमत 45,000 रुपये आहे (एक्स-शोरूम) आणि एकदा बॅटरी संपूर्ण चार्ज केली ती गाडी 85 किमीपर्यंत रेंज देतेय.त्यानंतर, तुमच्याकडे पर्याय म्हणून Komaki XGT KM देखील आहे, ज्याची किंमत 42,500 रुपये आहे. तसंच ही स्कूटर सिंगल चार्जमध्ये 85 किमीची रेंज देते. तुम्ही हीरो इलेक्ट्रीक फ्लॅश हादेखील पर्याय पाहू शकता. याची किंमत 46,640 रुपये आहे आणि एका चार्जवर ही स्कूटर 85 किमी पर्यंत बॅटरी रेंज देते. तसंच तुमच्याकडे पर्याय म्हणून हीरो इलेक्ट्रीक डॅश देखील आहे, या स्कूटरची किंमत 50,000 रुपयांपासून सुरू होते आणि 60 किमी पर्यंत याची बॅटरी रेंज आहे.

एवन आणि अॅम्पियर कंपनीच्या इलेक्ट्रीक स्कूटरजर तुम्हाला ५० हजार रुपयांच्या आत इलेक्ट्रीक स्कूटर घ्यायची असेल, तर तुमच्याकडे Ampere Reo चा पर्याय देखील आहे. या स्कूटरची किंमत 43,490 रुपयांपासून सुरू होते आणि ही स्कूटर सिंगल चार्जमध्ये 50 किमीपेक्षा जास्त बॅटरी रेंज देते. याशिवाय तुमच्याकडे Evolet Polo स्कूटरचादेखील पर्याय आहे. याची किंमत 44,499 रुपयांपासून सुरू होते आणि एकदा चार्ज केल्यांतर ही स्कूटर 60 किमीची रेंज देते. तुम्ही Avon E Scoot देखील खरेदी करू शकता, या स्कूटरची किंमत 45,000 रुपये असून ती 65 किमी पर्यंत रेंज देते. Avon E Lite फक्त 28,000 रुपयांमध्ये उपलब्ध आणि एका चार्जवर ही स्कूटर 50 किमची रेंज देते.

कमी किंमतीत अधिक रेंजतुम्ही Raftaar Electrica इलेक्ट्रीक स्कूटर 50,000 रुपयांपेक्षा कमी किंमतीच्या रेंजमध्येदेखील खरेदी करू शकता. या स्कूटरची किंमत 48,540 रुपये आहे आणि तिची बॅटरी देखील चांगली आहे. दुसरीकडे, Ampere V48 इलेक्ट्रीक स्कूटर हा पर्यायदेखील उत्तम आहे. या स्कूटरची किंमत किंमत 37,390 रुपये इतकी आहे. तसंच या स्कूटरची रेंज 45 किमी पर्यंत आहे. येत्या काळात, भारतात अनेक परवडणाऱ्या इलेक्ट्रीक स्कूटर्स लॉन्च होणार आहेत.

टॅग्स :electric vehicleवीजेवर चालणारं वाहनIndiaभारत