Baaz Electric Scooter: भारतात इलेक्ट्रिक वाहनांची मागणी झपाट्याने वाढत आहे. इलेक्ट्रिक कार असो की इलेक्ट्रिक स्कूटर, सर्वांच्या विक्रीत लक्षणीय वाढ झाली आहे. सध्या इलेक्ट्रिक स्कूटर सेगमेंटमध्ये Hero Electric, Okinawa, Ampere, Ather Energy, TVS आणि Ola Electric या कंपन्यांचे वर्चस्व आहे. मात्र, याशिवाय अनेक नवीन स्टार्टअप्सही या क्षेत्रात येत आहेत. हे स्टार्टअप कितपत यशस्वी होतात, ते भविष्यात कळेलच.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, आता नवीन इलेक्ट्रिक व्हिकल स्टार्टअप 'Baz Bikes' देखील बाजारात आले आहे. कंपनीने 'बाज' ईव्हीसह EV मार्केटमध्ये एंट्री केली आहे. या बाज इलेक्ट्रीकची किंमत फक्त 35 हजार रुपये असणार आहे. या ई-स्कूटरमध्ये बॅटरी स्वॅपिंग फीचर देण्यात आले आहे. याची बॅटरी फक्त 90 सेकंदात बदलली जाऊ शकते.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, या स्कूटरची मोटर आणि बॅटरी IP65 रेटिंगसह येते. या स्कूटरची टॉप स्पीड 25 किमी प्रतितास असेल. समोर आलेल्या स्कूटरच्या फोटोनुसार, यावर फक्त एका व्यक्तीला बसता येईल. या स्कूटरची लांबी 1624 मिमी, रुंदी 680 मिमी आणि उंची 1052 मिमी आहे. दरम्यान, सिंगल चार्जमध्ये ही स्कूटर किती किमीची रेंज देईल, याबाबत माहिती समोर आलेली नाही.