नवी दिल्ली : सध्या भारतीय बाजारपेठेत इलेक्ट्रिक वाहनांची मागणी वाढल्याचे दिसून येत आहेत. यातच इलेक्ट्रिक स्कूटर आणि बाइक्सची मागणी जास्त आहे. त्यामुळे अनेक कंपन्यांनी आपली वाहने इलेक्टिक करण्याकडे मोर्चा वळविला आहे. दरम्यान, यातच कायनेटिक ग्रीन झूम इलेक्ट्रिक स्कूटर (Kinetic Green Zoom Electric Scooter) सध्या चर्चेत आहे. ही एक स्लीक डिझाइन असलेली आणि लाँग रेंज मिळणारी स्कूटर आहे.
Kinetic Green Zoom Priceकंपनीने कायनेटिक ग्रीन झूम इलेक्ट्रिक स्कूटर 75,100 रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीसह लाँच केली आहे. ही किंमत स्कूटरच्या टॉप मॉडेलमध्ये 82,500 रुपयांपर्यंत जाते.
Kinetic Green Zoom Battery and Motorया इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये 60V, 28Ah क्षमतेच्या लिथियम-आयन बॅटरी पॅकसह 250W असलेली BLDC टेक्नॉलॉजी इलेक्ट्रिक मोटर आहे. या बॅटरीच्या चार्जिंगबाबत कंपनीचा दावा आहे की, यासोबत देण्यात आलेल्या होम चार्जरद्वारे ही बॅटरी 3 ते 4 तासांत फुल चार्ज होते.
Kinetic Green Zoom Range and Top Speedकायनेटिक ग्रीन झूमच्या रेंजबाबत कंपनीचा दावा आहे की एकदा फुल चार्ज केल्यानंतर ही इलेक्ट्रिक स्कूटर 100 किलोमीटरची रेंज देते आणि ही रेंज ARAI प्रमाणित आहे. स्कूटरला 40 kmph चा टॉप स्पीड देखील मिळतो.
Kinetic Green Zoom Braking and Suspensionकायनेटिक ग्रीन झूम इलेक्ट्रिक स्कूटरच्या फ्रंट आणि रिअरमध्ये डिस्क ब्रेक्स बसवण्यात आले आहेत, त्यासोबत कॉम्बी ब्रेकिंग सिस्टीमही बसवण्यात आली आहे. सस्पेन्शन सिस्टिम बद्दल बोलायचे झाले तर फ्रंटला टेलिस्कोपिक फोर्क सस्पेन्शन आणि स्प्रिंग बेस्ड 5 टाईम ऍडजस्टेबल शॉक ऍब्जॉर्बर सिस्टीम बसवण्यात आली आहे.
Kinetic Green Zoom Featuresफीचर्सबद्दल बोलायचे झाल्यास, कायनेटिक ग्रीन झूम इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये रिमोट स्टार्ट, पुश बटण स्टार्ट, यूएसबी चार्जिंग पोर्ट, सेंट्रल लॉकिंग, पास स्विच, डिजिटल स्पीडोमीटर, डिजिटल ट्रिप मीटर, एलईडी हेड लाईट, एलईडी टेल लाईट, एलईडी टर्न सिग्नल लॅम्प, लो बॅटरी इंडिकेटर सारखी फीचर्स देण्यात आली आहेत.