नवी दिल्ली, दि. 5 - अमेरिकेतील प्रसिद्ध दुचाकी कंपनी कंफेरेटेड मोटारसायकल आता इलेक्ट्रिक दुचाकी बनवणार आहे. इलेक्ट्रिक दुचाकींच्या निर्मितीसाठी ही कंपनी कर्टिस मोटारसायकल्सच्या बॅनरखाली निर्मिती करणार आहे. निर्मिती प्रक्रियेची तयारी करण्यासाठी कंपनीने झीरो मोटारसायकल्स कंपनीसोबत भागीदारी केली आहे. झीरो मोटारसायकल्स कंपनीचा 100 पर्सेंट इलेक्ट्रिक स्ट्रीट आणि डर्ट बाइक्स बनवण्यामध्ये हातखंडा आहे. आर्टिस्टिक आणि महागड्या दुचाकी बनवण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या कंफेडेरेट मोटारसायकल्सला कॉम्बॅक्ट मालिकेतील दुचाकींव्यतिरिक्त एक्स132 हेलकॅट आणि पी51 फायटर दुचाकींसाठी ओळखले जाते. भारताचा माजी कर्णधार आणि आघाडीचा क्रिकेटपटू महेंद्रसिंह धोनीकडेसुद्धा मर्यादित निर्मिती झालेल्या हेलकॅट बाइक्स आहेत. महागड्या आणि डिझायनर दुचाकी बनवणाऱ्या या कंपनीने आतापर्यंत जेवढ्या दुचाकींची निर्मिती केली आहेत. त्या सर्व मर्यादित आवृत्तीमधील आहेत. तसेच अनावरणाच्या वेळीच ही कंपनी निर्मितीच्या वेळीच विक्रीची अट ठेवत असते. सध्या या कंपनीची Confederate FA-13 ही दुचाकी विक्रीसाठी उपलब्ध आहे. तसेच या प्रकारच्या केवळ 22 दुचाकीच बनणार आहेत. क्रूटीसची पहिली इलेक्ट्रिक बाइक एक शक्तिशाली क्रूझर असेल. जिचे नाव हर्क्युलस असेल. या बाइकमध्ये दोन इलेक्ट्रिक मोटर दिल्या जातील. ज्या झीरो मोटारसायकल्सकडूवन घेण्यात येतील. ही मोटार 175 पीएस पॉवरसोबत 393 न्यूटन मीटरचा पीक टॉर्क जनरेट करू शकते. मात्र या कंपनीकडून आपल्या पहिल्या इलेक्ट्रिक मोटारसायकलच्या किमतीबाबत खुलासा करण्यातल आलेला नाही. पेट्रोल-डिझेलसारखे पारंपरिक उर्जेचे स्रोत हळूहळू संपुष्टात येत असल्याने पर्यायी उर्जेच्या स्रोतांचा शोध सुरू झाला आहे. त्यातच आता आधुनिक तंत्रज्ञानामुळे अद्ययावत इलेक्ट्रिक कार निर्मिती शक्य होऊ लागली आहे. त्यामुळे येत्या आठ वर्षांमध्ये पेट्रोल आणि डिझेलवर चालणाऱ्या कार इतिहासजमा होण्याची शक्यता आहे. पुढच्या काळात पेट्रोल पंप आणि पेट्रोल आणि डिझेलवर चालणाऱ्या कारच्या सुट्या भागांची मोठ्या प्रमाणावर टंचाई जाणवू लागेल, त्यामुळे ग्राहक आपला मोर्चा इलेक्ट्रिक कारकडे वळवतील. स्टॅनफोर्डचे इकॉनॉमिस्ट टोनी सीबा म्हणतात, जागतिक तेल कंपन्यांचा व्यापार 2030 पर्यंत शेवटच्या घटका मोजू लागेल. इलेक्ट्रिक कारचे यूग वाहतुकीला पूर्णपणे बदलून टाकेल, असेही टोनी यांनी आपल्या लेखात म्हटले होते. स्टॅनफोर्ड विद्यापीठात प्रसिद्ध झालेल्या या अध्ययन अहवालात पुढील 8 वर्षांत पेट्रोल आणि डिझेलवरील कार बंद होतील आणि नाइलाजास्तव लोक इलेक्ट्रिक कार आणि अॅटॉनॉमस व्हेईकल्सकडे वळतील, असेही नमूद करण्यात आले होते.
महागड्या आणि डिझायनर दुचाकींसाठी प्रसिद्ध असलेली अमेरिकेतील कंपनी बनवणार इलेक्ट्रिक दुचाकी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 05, 2017 5:25 PM