नवी दिल्ली : सध्या भारतातील ऑटो क्षेत्रात इलेक्ट्रिक वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अनेक कंपन्या आपल्या नवीन इलेक्ट्रिक गाड्या बाजारात आणत आहेत. यातच आता ईव्ही स्टार्टअप कंपनी Enigma Automobiles ने आपली हाय स्पीड इलेक्ट्रिक स्कूटर Enigma Ambier N8 लाँच केली आहे.
विशेष बाब म्हणजे ही स्वस्त स्कूटर सिंगल चार्जवर २०० किमीपर्यंतची रेंज देऊ शकते, असा दावा दावा कंपनीकडून करण्यात आला आहे. जर तुम्ही नवीन इलेक्ट्रिक स्कूटर घेण्याचा विचार करत असाल, तर तुम्ही Enigma Ambier N8 ची एक पर्याय म्हणून निवड करू शकता.
चार्जिंग टाइम आणि रेंज?Ambier N8 एकदा चार्ज केल्यानंतर २०० किमीपर्यंतचे अंतर पार करू शकते. दुसरीकडे, चार्जिंगच्या वेळेबद्दल बोलायचे तर ही स्कूटर चार्ज करण्यासाठी २ ते ४ तास लागतात. आपल्या ग्राहकांच्या विविध गरजा ओळखून कंपनीने Ambier N8 स्कूटरची डिझाइन ही अनेकांना आकर्षित करण्यासाठी केली आहे.
किती आहे किंमत?एनिग्मा ऑटोमोबाइल्सने Ambier N8 स्कूटर १,०५,००० रुपयांपासून ते १,१०,००० रुपयांपर्यंत (एक्स-शोरूम) दरम्यान लाँच करण्यात आली आहे. कंपनीच्या वेबसाइटवर जाऊन तुम्ही ही इलेक्ट्रिक स्कूटर ऑनलाइन बुक करू शकता.
बॅटरी पॅकAmbier N8 इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये 500W मोटर देण्यात आली आहे. या स्कूटरचा टॉप स्पीड ४५ ते ५० किमी/तास आहे. याचबरोबर, कंपनीचा दावा आहे की, ही इलेक्ट्रिक स्कूटर २०० किलोपर्यंतचा भार घेऊन जाऊ शकते.
कलर ऑप्शनAmbier N8 ही स्कूटर थंडरस्टॉर्म ग्रे, व्हाईट, ब्लू, मॅट ब्लॅक आणि सिल्व्हरसह पाच आकर्षक कलरमध्ये उपलब्ध आहे, ज्यामुळे ग्राहकांना त्यांची वैयक्तिक शैली आणि पसंती दर्शवणारी स्कूटर निवडता येते.