भारतीय कंपनी EV Plugs India ने इलेक्ट्रिक व्हेईकल युजर्ससाठी एक अॅप लाँच केले आहे. या अॅपचे नाव EV Plugs असे ठेवण्यात आले आहे. या अॅपच्या मदतीने इलेक्ट्रिक व्हेईकल युजर्स आपल्या आजूबाजूच्या ईव्ही चार्जिंग स्टेशनची माहिती घेऊ शकतील. हे अॅप एका क्लिकमध्ये EV charging stations शोधण्यास मदत करेल. या अॅपमध्ये सध्या 1000 पेक्षाही जास्त वेरिफाइड इलेक्ट्रिक व्हेईकल चार्जिंग स्टेशनची माहिती उपलब्ध आहे.
दिल्लीमधील EV Plugs कंपनीने अँड्रॉइड आणि आयओएससाठी EV Plugs अॅप लाँच केले आहे. इलेक्ट्रिक व्हेईकल युजर्स सध्या उपलब्ध असलेल्या चार्जिंग स्टेशन्सची माहिती या अॅपमधून मिळवू शकतात. तसेच भविष्यात या अॅप चार्ज करण्यासाठी स्लॉट बुकिंगचा ऑप्शन देखील देण्यात येईल, असे कंपनीने सांगितले आहे. तसेच भविष्यात अजून संबंधित सुविधा देण्याचा कंपनीचा प्रयत्न असेल.
होपचार्ज सेवा
होपचार्जची ऑन-डिमांड चार्जिंग सेवा कंपनीच्या अँड्रॉइड किंवा आयओएस अॅपवरून बुक करता येईल. बुकिंग झाल्यानंतर कमीत कमी वेळात एक कस्टम हार्डवेयर, बॅटरी Hopcharge e-Pod ग्राहकांपर्यंत येईल. ही एक CNG वॅन आहे, जी बॅटरीसह कमीत कमी वेळात ईव्ही चार्ज करण्यासाठी बनवण्यात आली आहे. होपचार्जने कमीत कमी 36 मिनिटांत इलेक्ट्रिक व्हेइकल्स चार्ज करण्याचा दावा केला आहे. साहजिक आहे हा चार्जिंग टाइम प्रत्येक व्हेईकलच्या क्षमतेवर अवलंबून असेल. परंतु या सर्विसमुळे अनेक इलेक्ट्रिक कार मालकांची गैरसोय कमी होईल. होपचार्जच्या मदतीने इलेक्ट्रिक कार मालक कधीही आणि कुठेही आपली कार चार्ज करू शकतात. कारण ही एक ऑन डिमांड ईव्ही चार्जिंग सर्व्हिस आहे.