भारतीय बाजारात येत्या काळात एक चकाचक एसयुव्ही लाँच होणार आहे. जी आकर्षक लुक आणि फिचर्सने लोकांना वेडे करणार आहे. मारुतीची फ्राँक्स ही एसयुव्ही येत असताना आणखी एक कंपनी अशीच एक एसयुव्ही आणण्याची तयारी करत आहे.
रेनॉ इंडिया येत्या काळात नवीन एसयुव्ही आरकाना लाँच करणार आहे. ही एसयुव्ही डस्टरची कमी दूर करणार आहे. कुपे डिझाईनच्या अरकाना एसयुव्हीची किंमत भारतीय बाजारात २० लाख रुपयांच्या आसपास असू शकते. ही कार अनेकदा टेस्टिंगवेळी स्पॉट झाली आहे.
Renault Arkana मध्ये 1.3-लिटर पेट्रोल इंजिन असू शकते. यामध्ये माईल्ड हायब्रिड टेक्निक असेल. एसयूव्हीमध्ये मॅन्युअल तसेच ऑटोमॅटिक ट्रान्समिशनचे पर्याय पाहायला मिळतील. कूप-स्टाईल SUV ची लांबी 4.5 मीटर, रुंदी 1.8 मीटर आणि उंची 1.5 मीटर असेल. अर्कानाचा व्हीलबेस 2731 मिमी आहे आणि ग्राउंड क्लीयरन्स देखील खूप चांगला आहे.
Renault Arkana मध्ये LED DRLs आणि हेडलॅम्प तसेच स्टायलिश टेललॅम्प देण्यात आले आहेत. ही एसयुव्ही मारुती, ह्युंदाई, टाटाच्या गाड्यांना कडवी टक्कर देणार आहे.